Avoid Food in Diabetes: मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांना काय खावे आणि काय खाऊ नये, हेच समजत नाही. हा असा आजार आहे, जो इतर अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकतो. मधुमेहाचा आपल्या शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर (Insulin Levels) परिणाम होतो. अशा परिस्थितीत रुग्णाला औषधांसोबतच आहाराचीही खूप काळजी घ्यावी लागते. अशा लोकांना हे माहित असले पाहिजे की, रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यासाठी (Healthy Blood Sugar Leve) त्यांचा आहार कसा संतुलित करावा.


मधुमेहाचा थेट परिणाम आपल्या आहारावर होतो. जर, तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची (Manage Blood Sugar Level)  असेल, तर तुमच्या आहाराचे व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे आहे. मधुमेहाचे रुग्णांनी काय खाऊ नये, याबद्दल तुम्हाला माहीती आहे का?


मधुमेहाच्या रुग्णांनी ‘हे’ पदार्थ टाळावेत


मनुका : मधुमेहाच्या रुग्णांनी सुक्या मेव्यात मनुके खाणे टाळावे. मनुके गोड असतात, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी मनुका खाणे टाळावे. सुका मेवा हा ताज्या फळांचा कांसन्ट्रेटेड फॉर्म आहे. द्राक्षे आणि मनुका यांच्यातील कार्बोहायड्रेट्समध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे मनुके आपल्या आहारातून वगळले पाहिजेत.


व्हाईट ब्रेड : मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मधुमेहग्रस्त रुग्णांनी व्हाईट ब्रेड अजिबात खाऊ नये. ज्यामध्ये स्टार्च जास्त असेल, असे अन्न देखील खाऊ नये. पांढरा ब्रेड, मैदा, पास्ता आणि इतर पिष्टमय पदार्थ खाऊ नयेत. अशा गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.


चिकू : मधुमेहाच्या रुग्णाने फळांमध्ये चिकू खाणेही टाळावे. चिकू चवीला खूप गोड असतो आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप जास्त असतो. त्यामुळे साखरेच्या रुग्णांनी चिकू खाऊ नये.


फुल क्रीम मिल्क : दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्व आवश्यक पोषक तत्वे दुधात आढळतात. त्यामुळे आहारात दुधाचा समावेश करणे योग्य ठरते. पण, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही फुल फॅट/क्रीम दूध पिऊ नये. अतिरिक्त चरबीमुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्याऐवजी कमी चरबीयुक्त दूध वापरा.


बटाटे : मधुमेहाच्या रुग्णांनीही बटाट्याचे सेवनही फार कमी प्रमाणात करावे. जास्त बटाटे खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाणही खूप जास्त असते. बटाटे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha