Covid-19 : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येने सगळ्यांनाच चिंतेत पाडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन आकडे समोर येत आहेत. या आजारापासून बचाव करण्यासाठी वेगवगळे पर्यायदेखील निवडले जातायत. काही ठिकाणी तर वर्क फ्रॉम होमदेखील सुरू केले आहे. परंतु, काही ऑफिसमध्ये 50 टक्क्यांच्या उपस्थितीत काम सुरु आहे. तुम्हीसुद्धा ऑफिसला जाऊन कॅंटिनमध्ये जेवण करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी. 

लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा :कोरोनाचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे अंतर टाळणे. कोणत्याही वस्तूला हात लावण्याआधी जसे की, ट्रे, जेवणाचे ताट, ग्लास, रूमाल, टेबल, मीठ, साखर यांना स्वच्छपणे साफ केल्याशिवाय हात लावू नका. 

नियमांचे पालन करा :लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. गर्दीपासून दूर राहा. शक्यतो ग्रूपमध्ये जेवण करणं टाळा. 

पूर्णपणे शिजवलेले अन्न खा :नेहमीच घरचे पूर्ण शिजवलेले अन्न खा. उच्च तापमानात शिजवलेले अन्न खाल्ल्याने कोरोना संक्रमणाचा धोका टळतो. तसेच, सॅंडवीच, सलाद, दही, ताक यांसारखे थंड पदार्थ खाणे टाळा. सध्याच्या दिवसांत शक्यतो बाहेरचे अमली पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ ताजे तर नसतातच पण त्याचबरोबर तेलकट पदार्थांमुळे घशाला कोरड पडते. घशाला कोरड पडल्यास गुळण्या हा उत्तम घरगुती उपाय मानला जातो. 

गुळण्या करण्याचे फायदे :तुमच्या घशात असलेले जंतु हे तुमच्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे त्यांना नष्ट करणे गरजेचे आहे. गुळण्या केल्याने कोरडा खोकला देखील थांबतो. कोरोनाच्या काळात अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो अशात जर तुम्ही हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

[yt][/yt]