Health Benefits of Cloves : हिवाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला शरीरातील इम्यूनिटी वाढवायची असेल तसेच पोटासंबंधीत समस्या दूर करायच्या असतील तर तुम्ही रोज अनोशापोटी लवंग खाल्ली पाहिजे. जाणून घेऊयात रोज लवंग खाण्याचे फायदे...
पचन क्रिया सुधारते
रोज सकाळी अनोशापोटी लवंग खाल्ले तर पचन क्रिया सुधारते. तसेच पोटा संबंधित असणारे सर्व समस्या दूर होतात. लवंग खाण्याने पचन क्रियेतील अँझाइम स्त्रव वाढतो. ज्यामुळे अपचन कमी होते. लवंग रोज खाल्याने शरीरात फायबरचे प्रमाण देखील वाढते. तसेच लवंग तुमचे यकृत डिटॉक्स करते.
लवंग खल्ल्याने हडे मजबूत होतात. फ्लेवोनॉयड्स ,मँगनीज आणि यूजेनॉल इत्यादी गोष्टी लवंगामध्ये असतात.
लवंग खल्ल्याने रक्त पातळ होतं तसेच शरीरातील कॉलेस्ट्रोल देखील कमी होते. म्हणून ह्रदयविकार असणाऱ्यांनी लवंग खाणं फायदेशीर ठरेल.
जर चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा काळे डाग असतील तर यावर उपाय म्हणून रोज लवंग तेल आणि नारळाचं तेल चेहऱ्यावर लावावे. तसेच लवंग खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात. जर तुमचे डोके दुखत असेल तर तुम्ही लवंगापासून तायर केलेल्या तेलाने डोक्याची मालिश करावी. त्यामुळे डोके दुखी कमी होते.
अनोशापोटी 'हे' पदार्थ खाणं टाळाच
अनोशापोटी च्युईंगम खाणे तसेच चहा कॉफी पिणे टाळावे. जर तुम्ही सकाळी अनोशापोटी च्युईंगम चघळणं आरोग्यासाठी अपायकारक ठरतं.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha