Gargle Home Remedies : सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरस Covid-19 पुन्हा एकदा धूमाकूळ घालतोय. रोज कोरोनाबाधितांचे नवीन आकडे समोर येतायत. अशातच या आजारात सर्दी आणि खोकला हे महत्वाचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे या आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घसा खवखवणे ही खरंतर खूप छोटी समस्या आहे. परंतु, घसा खवखवल्यानंतर बोलण्याचीही इच्छा होत नाही आणि काही खाण्याचीही इच्छा होत नाही. या समस्येपासून जर तुम्हाला आराम हवा असेल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय आणि त्याचे फायदे सांगणार आहोत ते म्हणजे गुळण्या करणे. अनेक वेळा डॉक्टरसुद्धा गुळण्या करण्याचा सल्ला देतात. गुळण्या केल्याने घशाचा त्रास तर दूर होतोच पण त्याचबरोबर याचे अजूनही अनेक फायदे आहेत.
अशा प्रकारे करा गुळण्या :
तुळशीच्या पाण्याने करा गुळण्या - कोरोना काळात सर्दी खोकल्याची चिंता दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पाण्याने गुळण्या करू शकता. यामुळे घसा खवखवणर नाही, घशाला सूज येणार नाही आणि घसा दुखणारही नाही. तुळशीत भरपूर जंतुविनाशक गुणधर्मही असतात.
हळद आणि मीठाच्या पाण्याने करा गुळण्या - मीठात जंतुविनाशक गुणधर्म असतात. मीठ घशात अडकलेले जंतू नष्ट करण्याचं कामदेखील करतात. मीठामुळे घशाची सूजही कमी होते आणि खोकल्यापासून आरामही मिळतो. जर तुम्ही कोरोना बाधित असाल तर तुम्ही हा उपााय नक्कीच करून बघू शकता.
- गुळण्या करण्याचे फायदे :
तुमच्या घशात असलेले जंतु हे तुमच्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे त्यांना नष्ट करणे गरजेचे आहे.
गुळण्या केल्याने कोरडा खोकला देखील थांबतो.
कोरोनाच्या काळात अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो अशात जर तुम्ही हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.
हे ही वाचा :
- health tips : सकाळी अनोशापोटी लवंग खाण्याचे अनेक फायदे; जाणून घ्या...
- Health Tips : हिवाळ्यात 'हे' पदार्थ खा, सर्दीपासून होईल सुटका
- Health Care Tips : जाणून घ्या हिवाळ्यात 'मध' खाण्याचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]