Low Calorie And High Fiber Foods: कमी कॅलरी (Low Calorie) आणि मोठ्या प्रमाणात फायबरयुक्त (Fiber Diet) आहार म्हणजे, वजन कमी (Weight Loss Diet) करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी (To Keep Weight Under Control) एक गुणकारी मार्ग आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे (Health Benefits) आहेत. डायबिटीज (Diabetes), कोलेस्ट्रॉल (Cholesterol), हेल्दी लिव्हर (Healthy Liver), किडनी (Kidney), त्वचा  (Skin), केस (Hairs), निरोगी आतडे आणि हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेला आहार मदत करतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, सरासरी अमेरिकन दररोज फक्त 16 ग्रॅम फायबर खातात, तर त्यांच्या शरीराची गरज 25-30 ग्रॅम फायबर असतं.


वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आणि हाय फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे, हे खरं आहेच, पण प्रत्यक्षात बहुतेक लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात हा नियम कसा पाळावा आणि कोणत्या पदार्थांचं सेवन करावं, यामध्ये गोंधळ उडतो. कोणत्या पदार्थांमध्ये कमी कॅलरी आणि हाय फायबर असतं, याची माहिती नसते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. ते पदार्थ कोणते? जाणून घेऊयात सविस्तर... 


लो कलरी आणि हाय फायबक फूड्स कोणते? 




बेरीज (रासबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, जांभूळ) 


बेरीज आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. बेरीजमध्ये कॅलरीजचं प्रमाण अत्यंत कमी असतं. 3 ते 8 ग्रॅम बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स असतात. तर यामध्ये 50-60 कॅलरीज असतात. 




ब्रोकोली (Benefits of Broccoli)


एक कप (उकडलेल्या) ब्रोकलीमध्ये जवळपास 5 ग्रॅम फायबर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि के असतं. त्यासोबतच फोलेटही मुबलक प्रमाणात असतं. यामध्ये 55 कॅलरी असतात. 




गाजर (Carrot Benefits)


तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर डाएटमध्ये गाजराचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. एक कप गाजरात (शिजलेल्या) जवळपास 3.5 ग्रॅम फायबर असतं. बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्व आणि मिनरल्सही असतात. तर एक कप शिजलेल्या गाजरामध्ये अंदाजे 50 कॅलरीज असतात. 




पालक (Spinach For Weight Loss)


पालक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. एक कप शिजलेल्या पालकमध्ये जवळपास 4 ग्रॅम फायबर असतं. यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए, के आणि फोलेट असतं. यामध्ये जवळपास 40 कॅलरीज असतात. 




कोबी (Cabbage)


एक कप कोबीमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर आणि भरपूर व्हिटॅमिन सी, के असतं. या भाज्या जवळपास संपूर्ण भारतात दररोज वापरल्या जातात, परंतु जर तुम्ही त्यांचा योग्य पद्धतीनं आहारात समावेश केला, तर त्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही बेरीज आणि या भाज्या नाश्त्यात सॅलड म्हणून खाऊ शकता. जर तुम्हाला उत्तम रिझल्ट हवा असेल, तर या भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Egg for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज खा अंडी; पण कशी, उकडून की तळून?