Egg for Weight Loss: वाढलेल्या वजनाच्या (Wight Loss Diet) समस्येनं सध्या अनेकजण त्रस्त आहेत. धकाधकीची जीवनशैली (Lifestyle Tips) आणि चुकीचा आहार (Wrong Diet) यांमुळे अनेकांना वाढलेल्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. मग वाढलेल्या वजनाची लाज वाटायला लागली की उपायांची शोधाशोध सुरू होते. बाजारात मिळणारी औषधं, घरगुती उपाय (Home Remedies), व्यायाम (Exercise) यांसारखे अनेक उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? आहारात काही बदल करुन तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवू शकता. यासाठी तुम्हाला अंड (Egg) खूप मदत करतं. 


वजन कमी करण्यात अंड्याची भूमिका महत्त्वाची असते. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळतं. आहार तज्ज्ञांच्या मते, अंडी खाल्ल्यानं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही. प्रोटीनच्या व्यतिरिक्त, अंड्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्व आणि खनिजं असतात. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी, डी, ई, के, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम देखील अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतं. अनेकदा असं दिसून आलं आहे की, काही लोकांना पूर्ण अंडी खायला आवडतात तर काहींना फक्त अंड्याचा पांढरा (Weight Loss with Egg) खातात. पण वजन कमी करण्यासाठी नेमकं अंड कसं खावं? अंड्याचा पांढरा आणि पिवळा भाग खावा की नाही? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील, जाणून घेऊयात सविस्तर... 




अंड्याचा पांढरा भाग किंवा पूर्ण अंड खावं की नाही? 


आहार तज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं शरीरातील कॅलरी कमी कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही अंड्याचा पिवळा आणि पांढऱ्या भागासह पूर्ण अंड खाता, त्यावेळी शरीराला मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स मिळतात. पण त्यासोबत, कॅलरी आणि फॅट्सही शरीरात पोहोचतात. एका संपूर्ण अंड्यातून 5 ग्रॅम प्रोटीन आणि 60 ग्रॅम कॅलरी मिळतात. तसेच, काही प्रमाणात फॅट्सही मिळतात. जेव्हा तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खाता तेव्हा त्यामध्ये कमी प्रमाणात प्रोटीन आणि कॅलरीदेखील कमी असतात. त्यात फॅट्स अजिबात नसतात. एका अंड्याच्या पांढऱ्यामध्ये फक्त 3 ग्रॅम प्रोटीन आणि 20 कॅलरीज असतात. दरम्यान, त्यात इतर आवश्यक पोषक घटकही कमी असतात.


पूर्ण अंड की अंड्याचा फक्त पांढरा भाग, कशानं कमी होतं वजन? 


आहार तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला तुमचं वजन वेगानं कमी करायचं असेल, तर तुम्ही अंड्याचा फक्त पांढरा भाग खाणं फायदेशीर ठरतं. पण, दरवेळी केवळ अंड्याचा पांढरा भागच खाणं योग्य नसतं. म्हणजेच, जर तुम्ही पाच अंडी खात असाल तर त्यापैकी तीन अंड्यांचा पांढरा भाग खा आणि दोन अंडी पूर्ण खा. यामुळे शरीराला इतर पोषक तत्वही योग्य प्रमाणात मिळतील आणि तुमचं वजनही वाढणार नाही. तुम्ही अंड उकडून, तळूनही खाऊ शकता. तसेच, नाश्त्याला किंवा वर्कआउटनंतरही खाऊ शकता. पण तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर दररोज अंड्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आहारज्ज्ञ देतात. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Benefits of Garlic: अपचन, सांधेदुखी, सर्दी-खोकला सर्व समस्यांवर लसूण हाच उपाय; पण खाण्याची योग्य वेळ काय?