Health Tips : राग (Anger) हा आपल्या मानवाच्या स्वभावाशी (Human Behaviour) निगडीत आहे. कधी-कधी आपल्याला एखादी गोष्टी आवडली नाही, तर आपण चिडचिड किंवा राग (Human Emotion) करतो. ही समस्या काही लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. काही व्यक्तींना खूप राग येतो, मग कारण असो किंवा नसो. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर हा तुमचा स्वभाव आहे, असा अर्थ होत नाही. तर त्यामागेही काही वेगळं कारण असून शकतं. जर तुमच्या शरीरात या जीवनसत्त्वे (Vitamin) आणि खनिजांची (Minerals) कमतरता असेल तर त्यामुळे तुमचा मूड (Mood) खराब होऊ शकतो. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे (Vitamin Defeciency) काही लोकांची चिडचिड होते.


खूप चिडचिड होतेय आणि राग येतोय?


जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेशी असू शकतो. व्हिटॅमिन बी 6 आणि जीवनसत्त्वांची (Vitamin) कमतरता असलेल्या लोकांना जास्त राग येऊ शकतो. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.


व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता


व्हिटॅमिन बी 6 आपल्या शरीरात मेंदूच्या रसायनांप्रमाणे काम करते. व्हिटॅमिन बी 6 मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असल्यास, यामुळे फिल गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो.


व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता


व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा आणि सुस्त वाटू शकते. त्यामुळे कधी कधी इच्छा नसतानाही तुम्हाला कमीपणा जाणवून चिडचिड होऊ शकते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, तुम्हाला नैराश्यासारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.


'या' गोष्टींअभावीदेखील चिडचिड होते


झिंकची कमतरता


शरीरामध्ये झिंकची कमतरता भासल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते. झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे. झिंकच्या कमतरतेमुळे, तुम्हाला नैराश्याची लक्षणेदेखील दिसू शकतात.


मॅग्नेशियमची कमतरता


मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक वेळा तणावाचे व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होते. असा वेळी छोट्या-छोट्या गोष्टीवर तुमची चिडचिड होऊ शकते.


आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा


तुम्ही जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही पदार्थ समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ खाणं आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, एवोकॅडो आणि मांस यांचा आहारात समावेश करा. याशिवाय झिंक आणि मॅग्नेशियमसाठी मासे, ब्रोकोली आणि स्प्राउट्स यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Hair Fall : डायटिंगच्या नादात केस गळती वाढलीय? वजन कमी करताना केसांचं आरोग्य कसं राखाल?