Weight Loss And Hair Fall : सध्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अवेळी जेवण आणि चुकीचा आहार यामुळे बहतेकांचं वजन वाढतं. अनेक जणांना लठ्ठपणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. वजन कमी (Weight Los) करण्यासाठी काही लोक डायटिंग (Diet) करायला. डाएटिंगमुळे वजन कमी होतं पण, इतर काही समस्या उद्भवू शकतात. डाएटिंगमुळे आहारातील पोषक घटकांची कमतरता भासून केस गळायला लागतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना डायटिंग करताना अनेक वेळा केस गळतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी डाएट करतात, त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. परिणामी केस गळायला लागतात. डाएटिंग करताना केस गळती का होते आणि केस गळती टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.


केसांचं आरोग्य जपून वजन कसं कमी करावं? 


डाएटिंगमुळे केस गळतात का?


बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी आहार घेतात. वजन कमी झाले की शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात. केस मुळापासून कमकुवत झाल्यामुळे असे होते. याशिवाय फाटक्या टोकाचा त्रासही दिसू लागतो. पुरेशा प्रमाणात प्रथिने, लोह आणि इतर आहारातील फायबर सप्लिमेंट्सच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. अशा परिस्थितीत पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसांना पोषण मिळत नाही आणि केस गळू लागतात.


प्रथिने


डाएटींग करताना अनेक पदार्थ टाळले जातात. असं असलं तरी वजन कमी करताना डाएट करत असतानाही प्रथिनांचे सेवन करणं आवश्यक आहे. शरीराला आवश्यक प्रथिनांचा आहारात समावेश नक्की करावा. मांस, मासे आणि बीन्समध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आढळतात. प्रथिने केसांच्या कूप आणि निरोगी आहारास मदत करतात. प्रथिने अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. अंडी, पालक, लिंबूवर्गीय फळे, ड्रायफ्रूट्स, गाजर हा आहार घेतल्याने वजन कमी होऊ शकते आणि केस गळतीची समस्याही जाणवणार नाही.


व्हिटॅमिन 


वजन कमी करताना आवश्यक व्हिटॅमिन्सचं सेवनही आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, आयर्न आणि झिंक हे घटक खूप महत्वाचे आहेत. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासोबतच केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.


कॅलरीज


कॅलरीज शरीराला कार्य करण्यासाठी उर्जा देतात. डाएट करतानाही शरीराला आवश्यक प्रमाणात कॅलरीज घेणंही फार गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचं सेवन करणंही आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी डाएट करताना कॅलरीजचं सेवन कमी केल्याने पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केसगळतीची समस्या उद्भवते. त्यामुळे वजन कमी करताना तुमच्या डाएटमध्ये कॅलरीजचा समावेश नक्की करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Covid Vaccine : नवीन JN.1 व्हेरियंटवर कोरोना लस किती प्रभावी? तज्ज्ञांचं मत काय?