Benefits of Neem Leaves : कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. कडुलिंबाचा उपयोग अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो. इतकंचनाही तर याचा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जातो. कडुलिंबाच्या काडांच्या वापर दात साफ करण्यासाठीही केला जातो. कडुलिंबाच्या झाड्या पानापासून खोडापर्यंतचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. कडुलिंबाच्या पानांचा काय फायदा आहे जाणून घ्या.
उत्तम प्रतिकारशक्तीसाठी उपयोगी
कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असण्यासोबतच अँटी ऑक्सिडेंट्सही मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासोबतच ही पानं पेशींना होणारं नुकसान टाळण्याचंही काम करते. कडुलिंबाची ताजी पाने बारीक करून त्यात मध टाकून रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मात्र, जास्त कडुलिंब आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
त्वचेच्या समस्यांवर उपयोगी
कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. कडुलिंबाची पानं रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी मानली जातात. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर तुम्ही बाजारात मिळणारे कडुलिंबाचे सरबत डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. यामुळे तुम्हांला मुरुमांपासून सुटका मिळेल.
केसांसंबंधित समस्या होतील दूर
कडुलिंब असणार अनेक प्रकारचे शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांचा वापर करु शकता. यामुळे कोंडा आणि एलर्जी दूर होईल. कडुलिंबाची ताजी पाने वाटून तू तुम्ही केसांवर आणि टाळूवर लावू शकता. यामुळे कोंडा कमी होईल आणि केसही निरोगी राहतील.
दातांसाठीही उपयोगी
दात आणि हिरड्यांसाठीही कडुलिंब उत्तम मानला जातो. कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ करणे चांगलं मानलं जातं. यामुळे बॅक्टेरियापासून सुटका होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
Summer Care : सावधान! उन्हाळ्यात गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवण्याची चूक करताय? मग हे नक्की वाचा
- Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )