Kacchi Kairi Health Benefits : कैरी (Kairi), आवळा मीठ लावून खायला अनेकांना आवडते. कैरीचं आंबट लोणचं (Pickle) लोक आवडीने खातात. लहान मुलं झाडावरची कैरी तोडून मीठ लावून घातात. तर कैरीचे पन्हे देखील तयार केलं जातं. कैरी खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊयात कैरी खाण्याचे फायदे...


कैरी खाण्याचे फायदे काय?


कैरीमध्ये असते व्हिटॅमिन सी


कैरीमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते. व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढते. त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता. कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.   


हृदयविकाराचा धोका कमी होतो


कैरीमध्ये व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि फायबर (Fiber) असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन (Blood Circulatory System) योग्य पद्धतीने होते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.


पचन क्रिया सुधारते


कैरी खाल्ल्यानं पचन क्रिया सुधारते. अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच प्रेग्नन्सी मॉर्निंग सीकनेस आणि मळमळ जाणवत असेल, तरी देखील महिला कैरी खाऊ शकतात. कैरीमध्ये आढळणारे झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे डोळ्यांचे मॅक्युलर डिजनरेशनपासून संरक्षण करते.


उन्हाळ्यात का खावी कैरी? 


मॉर्निंग सीकनेस, बद्धकोष्ठता, अपचन, शरीरात वाढणारी उष्णता इत्यादी समस्या तुम्हाला उन्हाळ्यात जाणवत असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच कैरीचं पन्ह देखील तुम्ही उन्हाळ्यात पिऊ शकता. कैरीचं पन्ह उन्हाळ्यात प्यायल्याने शरीरातील उष्णतेचे परिणाम कमी होते. तसेच शरीरातील डिहायड्रेशन देखील कमी होते. कैरीचं सॅलेड देखील तुम्ही तयार करु शकता. कैरीचं सॅलड तयार करण्यासाठी स्विट कॉर्न, टोमॅटो आणि कैरी कापून मिक्स करा. या सॅलडवर तुम्ही मीठ टाकू शकता किंवा या सॅलेडमध्ये तुम्ही काळं मीठ देखील मिक्स करु शकता. तसेच तुम्ही कैरीची चटणी देखील खाऊ शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या: 


Health Tips : शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता कशी ओळखाल? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा