मुंबई : अभिनेता आमिर खान, हा 'परफेक्शनिस्ट' म्हणूनही ओळखला जातो. चित्रपटातील अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या अभिनेत्याची लेक मागील काही काळापासून कलाविश्वात चर्चेत आली आहे. ईरा, असं आमिरच्या मुलीचं नाव.


सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या इरानं कायमच तिच्या खासगी आयुष्यापासून ते अगदी कारकिर्दीपर्यंतच्या अनेक गोष्टी सर्वांपुढं मांडल्या आहेत. आता पुन्हा एकदा इरा चर्चेत आली आहे, ते म्हणजे तिनं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळं.


व्हिडीओला कॅप्शन देत इरानं लिहिलंय, 'इशारा- हा आनंददायी किंवा सकारात्मक व्हिडीओ नाही. किंवा हा दु:खी किंवा नकारात्मक व्हिडीओही नाही. तुम्ही तर काहीसे बुजलेले असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी चांगला असेलही किंवा नसेलही'. इराचं कॅप्शन पाहून प्रथमदर्शनी अनेकांचा गोंधळच उडत आहे.


इरानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती सांगताना दिसत आहे की, नैराश्याचा सामना करत असतानाही आपण कशा प्रकारे चुलत भावंड जेन मारिया खानचा विवाहसोहळ्याला हजेरी लावली. तिथं जाऊन आपल्याला नेमकं कसं वाटलं याचा खुलासा करत इरानं नवविवाहित दाम्पत्याच्या या नव्या प्रवासासाठी आपल्याला आनंदी झाल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे.





Video | तुकाराम मुंढे म्हणतात, 'विश्वास ठेवा हे सरकारी रुग्णालयच आहे'

लग्नाच्या सर्व छायाचित्रांमध्ये आपल्या मनातील वेदना लपवून चेहऱ्यावर हास्य आणण्याचा आपण खूप प्रयत्न केला, लग्नसोहळ्याच्या प्रत्येक समारंभाग सहभागी होण्याचाही प्रयत्न केला. नैराश्यावस्थेत असूनही आपण फक्त एका खोलीत पलंगावर पडून राहण्याला प्राधान्य नाही दिलं, असं इरानं सांगितलं. इराच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनीच तिच्या धाडसाचं कौतुक करत जीवनात ती शक्य त्या सर्व गोष्टी सहजपणे मिळवू शकेल अशा शुभेच्छा तिला दिल्या.