Health Tips : सुक्या मेव्यांमधला काजू (Cashew) खायला अनेकांना आवडतो. काजू अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी (Nutrients) समृद्ध असून आरोग्यासाठी (Health Benefits) खूप फायदेशीर आहे. गोड पदार्थांमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. काजू खूप महाग असतात. यामुळे बाजारात काजू खरेदी करताना किड लागलेले किंवा चवीनुसार खराब काजू विकत घेतल्यास आपला पैसाही वाया जातो. काजूच्या महागड्या किमतीचा वापर भेसळ करणारे लोक करताना दिसत आहेत.. सध्या बाजारात नकली काजूही मोठ्या प्रमाणात मिळतात. मग तुम्ही जे काजू खरेदी करत आहात ते दर्जेदार आहेत की नाही हे तुम्हाला कसं कळेल? खऱ्या आणि नकली काजूमध्ये फरक कसा करायचा? आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही काजू शुद्ध आहे की नकली हे तपासू शकता.


किंमत


चांगल्या प्रतीचे काजू थोडे महाग आहेत. जर काजू नैसर्गिक आणि दर्जेदार असेल तर ते लवकर खराब होऊ शकत नाही. निकृष्ट दर्जाचे काजू लवकर खराब होतात. त्यामध्ये कीटक आणि माइट्स असू शकतात. त्या काजूंची चवही लवकर खराब होऊ शकते.


रंग


काजू खरेदी करताना त्याच्या रंगांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जर काजूचा रंग थोडा पिवळा असेल तर तो नकली आहे, तर शुद्ध आणि अस्सल काजू पांढऱ्या रंगाचा असतो. त्याची चवही चांगली असेल. पांढरा काजूही असतो. आपण काजू खरेदी केल्यास, रंगाकडे लक्ष द्या. तसेच त्यावर कोणतेही डाग, काळेपणा किंवा छिद्र नाहीत हे तपासा, असे काजू आतून कुजलेले असू शकतात.


आकार


तुम्ही नैसर्गिक काजू त्याच्या आकारावरून ओळखू शकता. जर काजू एक इंच लांब आणि थोडा जाड असेल तर तो खरा काजू असू शकतो. यापेक्षा मोठे किंवा अत्यंत लहान काजू बनावट असू शकतात. त्यामुळे काजू खरेदी करताना आकाराकडे लक्ष द्या.


सुगंध


तुम्ही काजूची शुद्धता त्याच्या सुगंधाने ओळखू शकता. जर काजूला सौम्य वास असेल तर ते नैसर्गित काजू आहेत. जर तेलाचा वास येत असेल तर ते नकली काजू असू शकतात.


चव


तुम्ही काजू खाऊनही त्यांची शुद्धता तपासू शकता. जर तुम्ही काजू चघळले आणि ते तुमच्या दातांना चिकटले तर समजून घ्या की ते नकली काजू आहे. बनावट काजू दातांना चिकटतात आणि लवकर निघत नाहीत. जर काजू खाल्ल्यानंतर तुमच्या दातांना चिकटत नसेल तर ते शुद्ध आणि अस्सल काजूचे लक्षण आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Best Diet Plan : वजन कमी करायचं मग 'हे' डाएट करून पाहा, व्हॉल्यूम डाएट काय आहे? माहितीय