Back Pain Causes : आपल्या दिवसभरातील काही सवयीच आपल्या पाठीचं दुखणं (Back Pain), कांध्यांचं दुखणं (Sholder Pain), मानेचं दुखणं आणि अन्य समस्यांचं कारण ठरतात. यामध्ये सलग काही तास एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे, झोपण्याची पद्धत, एक्सरसाईज न करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. वेळीच जर तुम्ही अशा समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला नाही तर कधीकधी जाणवणारं हे दुखणं कायमस्वरूपी देखील होऊ शकतं. यासाठी तुमच्या ऑपरेशनची देखील वेळ येऊ शकते. 


झोपण्याची, बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते. फक्त बसण्याची चुकीची पद्धतच नाही तर उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेन साठी कारणीभूत ठरतो. अशीच काही कारणे आणि त्यावरचे उपाय या संदर्भात जाणून घेऊयात. 


खांद्यावर जास्त वजन घेणे 


ऑफिसला जाताना अनेकांना आपल्या बॅगेत भरपूर सामान घेऊन बॅग एकाच खांद्यावर लावण्याची सवय असते. अशा वेळी ट्रेनने, बसने उभ्याने प्रवास करणे तुमच्या पाठीच्या कण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान भरणं, किंवा बॅग खाली ठेवणं, तसेच बॅग एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर सतत ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. 


मोबाईलचा जास्त वापर 


तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण, मोबाईलच्या अति वापरामुळे तुमच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर प्रेशर येऊन तो त्रास वाढू शकतो. मोबाईलचा वापर करताना आपण इतके मग्न असतो की आपण आपल्या पोश्चरवर लक्षच देत नाही. सलग मान खाली घालून मोबाईल वापरणं, सरळ न बसता झोपून फोनचा वापर करणे या सवयी तुमच्या स्पाईन हेल्थसाठी योग्य नाहीत. 


चुकीच्या पद्धतीने खाली वाकणे


कळत नकळतपणे आपण सर्वच या चुका नेहमी करत असतो. वजन उचलण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खाली वाकतो. यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच तुमच्या कमरेला चमक देखील येऊ शकते. यासाठी नेहमी सूमो स्क्वॉट पोझिशनमध्ये बसून वस्तू उचलणं गरजेचं आहे. इतकंच नव्हे तर केर काढण्यासाठी सुद्धा हीच पोझशन असली पाहिजे. या व्यतिरिक्त पाठ, मान, कमर आणि कांध्याच्या दुखण्याला दूर करण्यासाठी काही एक्सरसाईज फॉलो करा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Fitness Tips : जिमला जाऊन कोणतेही व्यायाम करु नका, वयानुसार व्यायाम कसा करायचा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला