Diet for Weight Loss : सध्या वाढलेलं वजन (Weight) आणि लठ्ठपणा (Obesity) ही अनेकांची समस्या असल्याचं दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी काही जण व्यायाम करतात, काही जण डाएट (Diet) करतात, तर जण या दोन्हींची मदत घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हालाही वजन कमी करण्यासाठी काहीसा सोपा मार्ग हवा असेल तर ही बातमी वाचा.


वजन कमी करायचं मग 'हे' डाएट करून पाहा


वजन कमी करण्यासाठी डाएट करायचं म्हटलं की, जीभेचे चोचले पुरवता येत नाही. जंक फूट, जास्त कॅलरी असलेले अन्नही खाता येत नाही आणि यामुळे पोटभर जेवताही येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला डाएटिंगचा एक असा पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही भरपूर खाऊ शकता, पण तुम्हाला फक्त एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. डाएटिंगचा सोपा पर्याय म्हणजे व्हॉल्यूम डाएट, , याबाबत सविस्तर माहिती वाचा.


व्हॉल्यूम डाएट म्हणजे काय?


व्हॉल्यूम डाएट किंवा व्हॉल्यूम इटिंगमध्ये कमी कॅलरी असलेले अन्न जास्त प्रमाणात खाण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. तज्ज्ञांच्या मते, व्हॉल्यूम इंटिंग खाण्यामागील कल्पना अशी आहे की, जास्त प्रमाणात अन्न घेतल्याने तुम्हाला पोट भरते. सोप्या भाषेत, या डाएटिंगमध्ये भरपूर खायला मिळतं, पण कमी कॅलरी असणारं अन्न खाण्याला प्राधान्य दिलं जातं.


व्हॉल्यूम डाएटचे फायदे



  • वजन कमी करण्यास मदत होते. 

  • तुम्ही भरपूर खाऊ शकता.

  • खाताना लठ्ठपणाची काळजी करण्याची गरज नाही.

  • पोट भरते, त्यामुळे भूक कमी लागते. 

  • फायबरयुक्त आहार घेतल्यास जास्त खाण्याची समस्या हळूहळू दूर होते.

  • पचनसंस्था निरोगी राहते. 

  • चयापचय क्रिया मजबूत होते.

  • या डाएटमुळे ऊर्जाही मिळते.


व्हॉल्यूम डाएटमध्ये कोणते पदार्थ खावेत?



  • कलिंगड

  • खरबूज

  • द्राक्षे

  • पीच

  • लिंबूवर्गीय फळे

  • काकडी, कोबी यासारख्या भाज्यांपासून तयार केलेलं सॅलड

  • अंड्याचा पांढरा भाग

  • ओट्स

  • फळे

  • हंगामी भाज्या

  • कडधान्ये

  • नट्स

  • कमी चरबीयुक्त पदार्थ


कमी चरबीयुक्त आणि कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्याला फायबर, फोलेट, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह मिळते. लाइकोपीन आणि फायटोकेमिकल्सने समृद्ध असलेल्या हिरव्या भाज्या वजन कमी करण्यासोबतच शरीराची प्रतिकारशक्तीही वाढवतात.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Clove Tea : इवल्याशा लवंगाचे आरोग्यदायी फायदे, कोणत्या वेळी आणि कशाप्रकारे सेवन करावं? वाचा