Yoga Cure Piles : आठ ते नऊ तास ऑफिसमध्ये बसणं, आहारात (Healthy Diet) फायबरचं प्रमाण कमी असणं, लठ्ठपणा यांमुळे अनेकांना मूळव्याधचा त्रास (Piles) होऊ लागतो. कधीकधी बद्धकोष्ठता (Constipation) आणि अनुवंशिकता हे देखील कारण असू शकतं. पाईल्स किंवा मूळव्याध हे गुद्द्वार आणि मलाशयातील सुजलेल्या नसांमुळे होतं. ही एक सामान्य समस्या आहे जी, कोणत्याही वयात उद्भवू शकते. दरम्यान, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना याचा जास्त त्रास होतो. मूळव्याध हा एक अतिशय त्रासदायक आजार आहे, ज्यामुळे पीडित व्यक्तीला असह्य वेदना होतात. जर तुम्हालाही मूळव्याधचा त्रास होत असेल, तर यापासून सुटका मिळवण्यासाठी योगासनं मदत करू शकतात. नियमित योगा केल्यानं तुम्ही मूळव्याधाचा त्रास वाढण्यापासून रोखू शकता, तसेच, हा त्रास कायमचा दूर करू शकता. 


फाईल्समध्ये कसा फायदेशीर ठरतो योगाभ्यास? (How Is Yoga Beneficial in Piles?)


योगाभ्यास वाढवेल ब्लड सर्क्युलेशन 


नियमितपणे योगाभ्यास केल्यानं तुमच्या संपूर्ण शरीरात ब्लड सर्क्युलेशन उत्तम होतं. ज्यामुळे मलाशयात रक्ताचा प्रवाह उत्तम होतो. यासाठी तुम्ही लेग्स अप द वॉल आणि चाईल्ड पोजे म्हणजेच, बालासन यांसारखे योगाभ्यास करू शकता. 


टेन्शन दूर करा 


फारच कमी लोकांना माहिती आहे की, टेन्शन आणि पाईल्स यांचा एकमेकांशी संबंध आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून तणावात असाल तर, तुम्हाला पाईल्स होण्याचा धोका अधिक असतो. टेन्शन कमी करण्यासाठी योगाभ्यास फायदेशीर ठरतो. अशावेळी तुम्ही डीप ब्रीदिंग आणि मेडिटेशन नियमितपणे करू शकता. 


ओटीपोटाचे स्नायू मजबूत करा 


तुमच्या ओटीपोटाचे स्नायू जेवढे मजबूत असतील, तेवढंच तुमचं गुद्द्वार आणि मलाशय दोन्ही उत्तम पद्धतीनं काम करू शकतील. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी होईल आणि पाईल्सचा त्रासही कमी होईल. यामुळे मलासन आणि भुजंगासन नियमितपणे करावं. 


 'या' गोष्टीची काळजी घ्या 


जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होत असेल, तर तुम्ही दररोज योगाभ्यास करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या शरीरावर जास्त दबाव टाकू नका, अन्यथा यामुळे समस्या आणखी वाढू शकते. अनुलोम-विलोम, वृक्षासन, सर्वांगासन ही आसनं तुम्ही करा, तुमच्या पाईल्सचा त्रास नक्की दूर होईल. 


पाईल्समुळे आलेली सूज अशी दूर करा 


मूळव्याधमुळे तुमच्या गुद्द्वार आणि गुदाशयात सूज येऊ शकते. अशा परिस्थितीत असा योग करावा ज्यामुळे सूज कमी होईल. रिक्लाइनिंग बाउंड अँगल पोज आणि स्टँडिंग फॉरवर्ड बेंड यांसारखी योगासने तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत.


ही योगासनं ठरतील उपयुक्त 


जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होत असेल तर काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. योगा करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योगा करताना हळूहळू सुरुवात करा आणि नंतर वेग आणि वेळ वाढवा. योगा करताना वेदना जाणवत असतील तर लगेच थांबा. रिकाम्या पोटी योगा करू नका. पुरेशा प्रमाणात पाणी आणि फायबरयुक्त अन्न खा. सतत बसू नका. या समस्येवर मात करण्यासाठी उत्तानासन, अर्ध मत्स्येंद्रासन, मार्जारासन, बध्द कोनासन आणि धनुरासन देखील फायदेशीर ठरू शकतात. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


रात्रीच दिसतात डायबिटीजची 'ही' खास लक्षणं; एक्सपर्ट्सनी सांगितलं कसं ओळखावं?