Diabetes Symptoms: आज, मधुमेहानं (Diabetes) ग्रस्त असलेल्या 90 टक्क्यांहून अधिक लोकांना टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) आहे. सुरुवातीच्या लक्षणांची ओळख नसल्यामुळे अनेक वेळा त्यांच्यावर उपचारही होत नाहीत. खूप थकल्यासारखं वाटणं किंवा वजन कमी होणं यांसारखी लक्षणं देखील मधुमेहामुळे दिसू शकतात. अलीकडेच मधुमेहाची काही लक्षणं समोर आली आहेत, जी फक्त रात्री दिसतात. या लक्षणांचा त्रास मधुमेहींना फक्त रात्रीच होतो.     

  


डायना बिएटिकी, ज्यांना ऑनलाईन 'द व्हॉईस ऑफ डायबिटीज' म्हणून ओळखलं जातं, त्यांनी अलीकडेच एका व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं की, रात्रीच्या वेळी पाय किंवा बोटांमध्ये जळजळ, वेदना, बधीरपणा किंवा मुंग्या येणं हे डायबेटिक न्यूरोपॅथी (मधुमेह असलेल्या लोकांच्या मज्जातंतूंचे नुकसान) होऊ शकते. एक चिन्ह असू शकते. ही परिस्थिती नसांना देखील नुकसान पोहोचवू शकते.


डायना बिएटिकी म्हणतात, "जळजळ, वेदना, बधीरपणा किंवा मुंग्या येणे सहसा पायाच्या बोटांमध्ये सुरू होते आणि हळूहळू वासरापर्यंत वाढू शकते. परिस्थिती जसजशी वाढत जाते, तसतसे हातांवर देखील परिणाम होऊ शकतो आणि त्या भागाला स्पर्श केल्यास देखील वेदना होऊ शकतात.


बिएटिकी पुढे म्हणाले, "सामान्यत: जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता, तेव्हा ते अधिक वाईट असतं, कारण झोपताना तुम्ही हालचाल करत नाही. डायबिटिज यूके म्हणतं की, डायबिटिज न्यूरोपॅथी बरा होऊ शकत नाही, परंतु जळजळ आणि बधीरपणाची लक्षणं औषधानं उपचार करता येतात. तसेच, जर एखाद्याचं कोलेस्ट्रॉल आणि हायब्लड प्रेशर योग्य राहिला तर या समस्यांपासून सुटका मिळू शकते. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, मधुमेहाचं आणखी एक लक्षण, जे रात्री जास्त दिसून येतं, ते म्हणजे वारंवार लघवी करणं. 


या व्यतिरिक्त, जर तुम्हाला खालील लक्षणं देखील दिसत असतील, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांना भेट द्या :



  • खूप तहान लागणं 

  • थकवा जाणवणं

  • वजन कमी होणं

  • मसल्स लॉस होणं

  • प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला खाज 

  • धुरकट दिसणं 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Liver Cancer: लिव्हर कॅन्सर, पुरुषांमधील पाचव्या, तर स्त्रियांमध्ये नवव्या क्रमांकाचा जीवघेणा कर्करोग; लक्षणं अन् उपचार काय?