How to Bath in Cold: हिवाळ्यात (Winter) आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्यावी लागते. काही लोक थंडीत अंघोळ करणे टाळतात. हिवाळ्यात अंघोळ  करण्यासाठी काही लोक खूप गरम पाण्याचा वापर करतात, याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.  हिवाळ्यामध्ये अंघोळ करताना या चुका टाळा-


हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ करणं टाळा 
डॉक्टरांच्या मते, कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. ब्लड सर्कुलेशन हे डोक्यापासून पायापर्यंत होते.  त्यामुळे जेव्हा थंड पाणी थेट डोक्यावर पडते तेव्हा ते मेंदूच्या बारीक नसा अकुंचन पावतात. थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं रक्ताभिसरणावरही परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांसंबंधात समस्या जाणवू शकतात.


गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं देखील जाणवू शकतात समस्या 
हिवाळ्यात अनेक लोक आंघोळीसाठी खूप गरम पाण्याचा वापर करतात. खूप गरम पाण्याने आंघोळ करणे देखील चांगले नाही. डॉक्टरांच्या मते, खूप गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं अनेक शारिरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेच्या संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं त्वचेतून नैसर्गिक तेलही कमी होऊ लागते.


हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी कोमट पाणी पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास हार्ट रेट वाढतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोमट पाणी अंगावर टाकल्याने स्नायू, सांधे आणि हाडांना आराम मिळतो. तसेच रक्तप्रवाहही सुरळीत राहतो.


अंघोळ करण्याचे फायदे-
डॉक्टरांच्या मते, अंघोळ करणे महत्वाचे आहे. रोज आंघोळ करावी. काही तज्ज्ञ हे अंघोळ करण्याच्या प्रक्रियेला  हायड्रोथेरपी किंवा क्रायोथेरपी असं देखील म्हणतात. तज्ज्ञाच्या मते, अंघोळ केल्याने मानसिक आणि भावनिक आरोग्याला फायदा होतो. हे त्या दोघांसाठी थेरपीसारखे आहे. आंघोळ केल्याने तणाव आणि चिंतेची समस्या दूर होते. आंघोळीमुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. एवढेच नाही तर आंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत राहते. अंघोळ केल्यानं तणाव आणि चिंता याशिवाय थकवा दूर होतो. अंघोळ करताना प्रथम पायावर पाणी टाकावे. या नंतर मान आणि खांद्यावर. हळूहळू शरीर पाण्याशी जुळवून घेतल्यानंतर डोक्यावर पाणी घाला.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Health Tips : चेहऱ्यावर वारंवार मुरुम येतात? झोपण्याच्या 'या' 5 चुका टाळा, काही दिवसांतच फरक जाणवेल