Health Tips : पिंपल्स हा मुला-मुलींच्या वाढत्या वयातील एक अविभाज्य घटक असतो. याचा त्रास मुलांपेक्षा मुलींना जास्त असतो. मुळात मुरूम ही अशी एक समस्या आहे की जी नको तेव्हा येते. घरातील कोणत्या सदस्याचं लग्न असेल, किंवा कोणतं प्रेझेंटेशन असेल, मुलाखत असेल तर अशा वेळी चेहऱ्यावर मुरुम येतात. यामुळे प्रचंड चिडचिड होते. चेहऱ्यावर मुरुम येण्याला अनेक कारणं जबाबदार असतात. जसे की, तेलकट, तिखट पदार्थ खाणं, हार्मोनल चेंजेस, अपुरी झोप, तणाव अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. 


चेहऱ्यावर वारंवार मुरुम येतात का?


आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या त्वचेच्या स्थितीवर परिणाम होतो आणि प्रत्यक्षात मुरुम येऊ शकतात. त्वचेसाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम असते; यामुळे त्वचा टवटवीत होते. मात्र, झोपेच्या संदर्भात काही चुका तुमचा चेहरा खराब करू शकतात. ज्यामुळे सकाळी तुम्हाला मुरुम येऊ शकतात. तुम्ही या चुका करत आहात आणि तुम्हाला नेहमी मुरुम का येतात याचा विचार करत आहात? तर आता या सवयी बदलण्याची वेळ आली आहे.


झोपताना तुम्ही केलेल्या 5 चुका ज्यामुळे मुरुम होतात


उशीचे कव्हर बदलू नका


वापरलेले कपडे धुणे जसा तुमच्या कामाचा एक भाग आहे, तसेच उशीचे कव्हर नियमितपणे धुणे आणि बदलणे देखील खूप महत्त्वाचे आहे. पिलो कव्हर्स धूळीचे स्त्रोत आहेत कारण त्यात बिल्ड-अपचा थर असतो. सहसा, आपण आपला चेहरा उशीच्या कव्हरवर ठेवतो आणि कव्हरवर असलेले बॅक्टेरिया त्वचेवर साचतात. ज्यामुळे मुरुमं येतात. म्हणूनच मुरुमांना दूर ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा उशीचे कव्हर बदलावे.


मेकअप करून झोपणे


अनेकदा काहीजण कामावरून घरी आल्यानंतर किंवा समारंभावरून उशिरा घरी आल्यानंतर चेहरा नीट स्वच्छ न धुवता तो तसाच राहून देतात. मेकअपचे अवशेष रात्रभर छिद्रे बंद करतात आणि यामुळे मुरुम होतात. त्यामुळे, तुम्ही कितीही थकलेले असलात तरी रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून झोपा.   


पोटावर झोपणे


पोटावर झोपल्याने देखील चेहऱ्यावर मुरुमं येऊ शकतात. जेव्हा तुम्ही पोटावर झोपता तेव्हा तुमची त्वचा उशीच्या कव्हरच्या थेट संपर्कात असते आणि तुमची त्वचा आणि उशीच्या कव्हरमध्ये रात्रभर घर्षण होते. म्हणून, जर तुम्हाला मुरुम टाळायचे असेल तर पोटावर झोपू नका. 


रात्रभर केसांना तेल लावून झोपणे 


हेअर ऑइल केसांसाठी उत्तम आहे, परंतु ते तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम करू शकतात. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी रात्रभर केसांना तेल लावून झोपू नये कारण रात्रभर तेल तुमच्या चेहऱ्यावर येते. आणि तेलकट त्वचा झाल्यामुळे त्यावर मुरुम येतात. जर तुम्हाला तुमच्या केसांची योग्य निगा राखायची असेल तर केस धुवण्यापूर्वी दोन तास आधी केसांना नीट मसाज करून केस धुवा.


चेहरा व्यवस्थित न धुतल्यास 


तुम्ही मेकअप केला नसला तरीही, तुमच्या त्वचेवर दिवसभर खूप घाण साचते. यासाठी दिवसातून किमान तीन ते चार वेळा चेहरा सतत पाण्याने धुवा. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी फेसवॉश वापरणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, फेसवॉश लावण्यापूर्वी नेहमी आपले हात चांगले धुवा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल