Aurangabad Measles Update: मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गोवर साथीचा उद्रेक (Measles Disease Outbreak) पाहायला मिळाला आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात (Aurangabad City) देखील गोवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे उद्रेक झालेल्या भागात गोवर रुबेला लसीकरण (Measles Vaccination) मोहीम राबविण्याचे शासनाचे निर्देश दिले.  ज्यात 15 डिसेंबर ते 25  डिसेंबर 2022  आणि 15 जानेवारी ते 26  जाने 2023  मध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) आरोग्य विभागाची बैठक (Health Department Meeting) पार पडली आहे. तसेच गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून राबवण्याबाबत चर्चा पार पडली. 


महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने मनपा मुख्यालय येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली कमिश्नर टास्क फोर्स कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. दरम्यान शहरात एकही बालक गोवर रुबेला लसीकरणा पासून वंचित राहता कामा नये अशा सूचना यावेळी मंडलेचा यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत 242 अतिरिक्त लसीकरण सत्र घेण्यात आलेले असून, त्यामध्ये उद्रेक झालेल्या भागात 5209  (87.22℅) बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. महानगरपालिकेकडे 3500 गोवर रुबेला लसीकरणाचा साठा उपलब्ध आहे. तसेच सर्व उद्रेक परिसरातील सर्व्हे पूर्ण झाला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. 


प्रत्येक महिन्यात लसीकरण सत्र


आज झालेल्या बैठकीत प्रामुख्याने नियमित लसीकरण सत्र (Out Reach Sessions) प्रत्येक महिन्यात 1000 लसीकरण सत्र घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तीनही PHN यांनी प्रत्येक महिण्यात दोन वेळेस सर्व स्टाफ, नर्स,ए.एन.एम यांची व्हीसीद्वारे RI नियोजन करणे,  तसेच आशा सुपरवायझर यांनी सर्व आशा वर्कर्स यांची बैठक घेऊन लसीकरण बळकटीकरण साठी प्रयत्न करण्याबाबत सूचना देण्यात आल्यात.


पालकांमध्ये लसीकरणा बाबत जनजागृती करावी


सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी जन्म झालेल्या बालकांना डिलिव्हरी रूम 'o' पोलिओ डोस व 'o' Hepatitis-B चा डोस देण्याची व्यवस्था करणे बाबत आदेशीत करण्यात आले. बालरोग तज्ञ असोसिएशन (IAP) ने गोवर उद्रेक भागात बालरोगतज्ज्ञ यांनी पालकांमध्ये लसीकरणा बाबत जनजागृती करावी. तसेच MR चा अतिरिक्त डोस 09 महिने ते 05  वर्ष वयोगटातील बालकांना देणेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.  


Aurangabad: औरंगाबादेत 10 दिवसांपासून कोरोना लसीकरण बंद; 'उपलब्ध होतील तेव्हा पाठवू', प्रशासनाचं मनपाला अजब उत्तर