Paracetamol: देशात पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भाव (Covid-19) वाढत आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येतही वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच बदलत्या वातावरणामुळेही अनेक साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. अनेकजण साथीच्या आजारांमुळे बेजार झाले आहेत. खोकला, सर्जी, ताप, सांधेदुखी यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अगदी घरगुती उपायांपासून ते डॉक्टरांच्या औषधांपर्यंत सगळं काही करुन झालं, तरी फरक काही जाणवत नाही. अनेकजण तर डॉक्टरांचा सल्ला न घेता सर्रास पॅरासिटामॉल घेत आहेत. एखाद्यावेळी ठिक... पण अनेकजण वारंवार पॅरासिटामॉलच्या गोळ्या (Paracetamol Tablets) वारंवार घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का? असं केल्यानं तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, पॅरासिटामॉलच्या किती गोळ्या एका दिवसात खाणं सुरक्षित आहे, तर डॉ. प्रियंका शेरावत यांनी याचं उत्तर दिलं आहे, चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर... 


तज्ज्ञ काय म्हणतात?


डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉलचं सेवन करत असाल, तर तुम्हाला त्यासंदर्भात सावध राहण्याची गरज आहे. डॉक्टर प्रियंका यांच्या म्हणण्यानुसार, आजारानुसार एका दिवसात 4 ग्रॅमपर्यंत पॅरासिटामॉल औषध घेता येतं. एका टॅब्लेटमध्ये सुमारे 650 मिलीग्राम सॉल्ट असतं. त्यानुसार, एका दिवसात 4 गोळ्या म्हणजेच, 2.6 मिलीग्राम टॅब्लेटचं सेवन करणं सुरक्षित आहे. डॉक्टरांनी पुढे बोलताना असंही सांगितलं की, जर तुम्ही एका दिवसात दोनपेक्षा जास्त पॅरासिटामॉल गोळ्या घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.


जर तुम्हाला ताप आला असेल तर सर्वात आधी डॉक्टरांना भेटा. डॉक्टर तापाचं नेमकं कारण शोधून काढतील आणि नंतर तुम्हाला औषध देतील. याशिवाय, ताप 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त असेल तर पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला दिला जातो. ताप जास्त असल्यास 6 ते 8 तासांच्या अंतरानं तुम्ही पॅरासिटामॉल घेऊ शकता. 






पॅरासिटामोल कोणी घेऊ नये? 



  • जर एखाद्या व्यक्तीला यकृत आणि मूत्रपिंडाशी संबंधित कोणताही आजार असेल तर अशा व्यक्तींनी पॅरासिटामॉल घेणं टाळावं.

  • पॅरासिटामॉल 2 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नये. अशा मुलांना ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्लानंच त्यांच्यावर औषधोपचार करावे. 

  • ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा स्तनपान करत आहेत, त्यांनी देखील पॅरासिटामॉल गोळ्या घेणं टाळावं.

  • तुम्ही जर रक्त पातळ करणारं औषध घेत असाल, तर अशा व्यक्तींनीही पॅरासिटामॉल डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Health News : मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका कसा वाढतो?