Hibiscus For Hair Fall: उन्हाळ्यात (Summer) केसांच्या संबंधित समस्या खूप जणांना जाणवतात. प्रदूषण, धूळ , उन्ह यांमुळे केस रफ होतात. अनेकांना उन्हाळ्यात केस गळतीची (Hair Fall) समस्या जाणवते. उन्हाळ्यात काही घरगुती उपाय करुन देखील तुम्ही केस गळती थांबवू शकता. जास्वंद या फुलामध्ये थंड गुणधर्म असतात. जर तुम्ही जास्वंद या फुलापासून तयार केलेली ही पेस्ट डोक्याला लावली तर स्काल्फ थंड राहतो आणि केस गळती देखील कमी होते. जाणून घेऊयात जास्वंदाच्या फुलापासून पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत...


जास्वंदाच्या फुलाची पेस्ट तयार करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्ट-


1. पेस्ट तयार करण्यासाठी तीन ते चार जास्वंदाची पाने आणि जास्वंदाचे फुले मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा.
2. या पेस्टमध्ये 4 चमचे दही घाला. दही घातल्यानंतर ही पेस्ट मिक्स करा.
3. ही पेस्ट तुमच्या केसांवर आणि स्काल्फवर लावा.
4. ही पेस्च  1 तास केसांवर राहू द्या.
5. जर तुमच्याकडे शॉवर कॅप असेल तर तुम्ही डोक्याला पेस्ट लावल्यानंतर शॉवर कॅप घालू शकता.
6. एक तासानंतर डोकं कोमट पाण्यानं धुवा.


जास्वंदाच्या फुलांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि एमिनो अॅसिड्स आढळतात. फ्लेव्होनॉइड्समुळे डोक्याच्या भागात रक्ताभिसरण व्यवस्थित होते. अमीनो अॅसिड केसांमध्ये केरेटिन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे केसांना शाइन येतो आणि केस लांब होतात, यामुळे केस दाट देखील होतात.जर तुम्हाला कोडां होत असेल तर तुम्ही जास्वंदाचे ऑइल वापरु शकता.  


जास्वंद या फुलामध्ये असे गुणधर्म आहेत जे आपल्या स्कॅल्फला उन्हामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स तुमच्या केसांना UVB किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीनसारखे काम करतात.


जास्वंदाच्या फुलांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहासारखे पोषक घटक असतात, जे केसांचे पोषण करतात. त्यात व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. स्कॅल्फ इंफेक्शनमुळे देखील केस गळतात. जर तुम्हाला स्कॅल्फ इंफेक्शन ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही  जास्वंदाचे  तेल किंवा जास्वंदाचा हेअर मास्क वापरु शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :


Health Tips : फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर