Yoga Asanas for Women : महिलांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या शरीरात अनेक बदल होत जातात. यासाठी महिलांनी त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. मग ते खाण्या-पिण्यापासून असो वा झोपण्यापर्यंत, तसेच रोजच्या व्यायामाशी संबंधितसुद्धा महिलांनी बदल करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल (Yoga Asanas) सांगणार आहोत. हे योगासन केल्याने महिला त्यांच्या वाढत्या वयातही स्वत:ला पूर्णपणे फिट ठेवू शकतात. तसेच अनेक आजारांपासून स्वत:ला दूर ठेवू शकता. महिलांसाठी फायदेशीर असणारे हे योगासन नेमके कोणते ते जाणून घ्या. 


महिलांसाठी उपयोगी असणारे आसन : 


1. भुजंगासन : हे आसन वाढत्या वयातील महिलांसाठी सर्वोत्तम आसनांपैकी एक आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराच्या वरच्या भागात स्ट्रेच तर जाणवतोच पण त्यामुळे चेहऱ्यावर चमकही येते.


2. धनुरासन : हे आसन केल्याने तुमच्या शरीरातील लठ्ठपणा तर कमी होतोच पण तुमच्या शरीराची मुद्राही योग्य राहते. हे तुमचे संपूर्ण शरीर चांगले ताणण्याचे काम करते.


3. तितली आसन : हे आसन केल्याने मासिक पाळी तर नियमित राहतेच पण ते तुमच्या मांड्या आणि पायांचे स्नायू मजबूत करण्याचे काम करते.


4. चक्की चालनासन : हे आसन केल्याने गर्भाशय, अंडाशय, किडनीसह शरीरातील अनेक भाग मजबूत होतात.


5. बालासन : हे आसन केल्याने संपूर्ण शरीर ताणले जाते, त्यामुळे दुखण्यात आराम मिळतो, तसेच कोणत्याही प्रकारचा ताण दूर होण्यास मदत होते.


6. उत्कटासन : हा व्यायाम कंबर, नितंब आणि मांडीसाठी सर्वोत्तम आहे. यामुळे पाय मजबूत होतात तसेच ते आकारात येण्यास मदत होते.


7. सेतू बंधनासन : हे आसन शरीराच्या खालच्या भागाला बळकट करण्यास मदत करते. हे तुमच्या पाठीच्या आणि नितंबांच्या दुखण्यातही आराम देते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :