Health Tips : स्तनाचा कर्करोग (Cancer) हा जागतिक स्तरावर स्त्रियांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. यावर जर वेळीच निदान झालं आणि  यशस्वी उपचारा झाले तर हा रोग बरा होऊ शकतो. स्त्रीच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक पैलूवर हा परिणाम करू शकतो. स्तनाच्या कर्करोगामुळे (Breast Cancer) भावनिक आणि मानसिक परिणाम होतात ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हे लक्षात समजून घेणं महत्त्वाचं आहे की स्तनाच्या सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात. तर, याची इतरही लक्षणं आहेत. जसे की, स्तनाचा आकार बदलणे, स्तनाग्रातून होणारा स्त्राव, स्तनाग्रांमध्ये वेदना होणे. याव्यतिरिक्त, स्तनांच्या स्वरूपातील कोणतेही बदल जसे की, लालसरपणा येणे, सूज किंवा त्वचेवर खवले दिसणे याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.


सुरुवातीला काही स्त्रियांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाही नाहीत. नियमित स्वयं स्तन तपासणी आणि मॅमोग्राम स्तनातील विकृती वेळीच शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या शरीराशी संबंधित सूक्ष्म बदलांकडे लक्ष देऊन आरोग्यासंबंधित समस्यांना प्रतिबंध करु शकतो.


कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांना कर्करोगाचा धोका जास्त 


स्तन कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांना कर्करोगाचा धोका अधिक असतो. या महिलांसाठी स्तनाच्या नियमित तपासण्या महत्त्वाच्या आहेत. कारण या आजाराचं वेळीच निदान झालं तर त्यावर यशस्वी उपचार करता येतात. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी मॅमोग्रामची शिफारस केली जाते. मात्र, ज्यांना स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी कमी वयातच कर्करोगाची संबंधित विविध तपासणी करणं गरजेचं आहे.  


स्तनाचा कर्करोग शोधण्यात वेळोवेळी  तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणी दरम्यान कोणतीही गाठ आढळल्यास दुर्लक्ष करु नये. नियमित तपासणी आणि स्वयं स्तन कर्करोगाग प्रतिबंध करतात·


जेनेटिक टेस्टद्वारे धोका टाळता येणार


याच संदर्भात पुण्याच्या मदरहुड हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, डॉ पद्मा श्रीवास्तव म्हणतात की, कर्करोग झालेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पूर्वी कर्करोग झालेला असेल तर या अनुवांशिक धोक्याची चाचणी घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. आता जेनेटिक टेस्टद्वावारे हा धोका ओळखता येणार आहे. या चाचणीद्वारे, एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणे शक्य होणार आहे. बीआरसीए जेनेटिक टेस्टिंगमध्ये BRCA1 आणि BRCA2 यांची तपासणी केली जाते. हे दोन्ही जीन्स स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगासाठी जबाबदार आहेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी