Swollen Legs Reasons : गुडघ्याच्या खाली तुमच्या पायाला सतत सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. कारण ही अनेक गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणेही असू शकतात. अनेकदा जास्त काम केल्यामुळे, पाय सुजतात आणि नंतर विश्रांती घेतल्यानंतर सूज (Swollen Legs) कमी येते. थंडीच्या दिवसांत कधी कधी पायांची बोटे सुजतात. जरी हे दुखणं तात्पुरतं असेल तरी यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. पायांना सूज येत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर छातीत दाब येत असेल तर वेळ न दवडता डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा धोकादायक परिस्थितीला कारणीभूत ठरू शकतो. त्यासंबंधित समस्या, कारणे आणि उपाय जाणून घेऊयात.
1. संधिवात
संधिवातामध्ये शरीराच्या सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि जडपणा येतो. या स्थितीत गुडघ्यापासून तळवे आणि घोट्यापर्यंत सूज येते. ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
अशी काळजी घ्या
जर तुम्हाला जळजळ आणि संधिवात टाळायचा असेल तर तुम्ही युरिक अॅसिड नियंत्रित करण्यावर भर द्यावा. यासाठी हाय प्रोटीनयुक्त आहार टाळा आणि दररोज व्यायाम करा.
किडनीचा त्रास
ज्यांची किडनी नीट काम करत नाही अशा लोकांच्या शरीरात द्रव साचतो. किडनीच्या आजारात फारशी लक्षणे दिसत नाहीत. अशा स्थितीत किडनीचे नुकसानही होऊ शकते. अशावेळी श्वास लागणे, लघवी खूप कमी होणे, लवकर थकवा येणे, कोमात जाणे अशा समस्या उद्भवू शकतात.
अशी काळजी घ्या
तुम्हाला किडनीचे आजार बरे करायचे असतील, तर औषधे, कमी प्रोटीनयुक्त आहार, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याचा प्रयत्न करा. किडनी निकामी झाल्यास डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लान्ट हा एकमेव उपाय मानला जातो.
हाय कोलेस्ट्रॉल
अमेरिकेच्या कार्डिओव्हस्कुलर लॅबनुसार, जर कोलेस्ट्रॉलची पातळी सतत वाढत असेल तर काही काळानंतर ते धमनी रोगाचा धोका देखील वाढवू शकतो. त्यामुळे पायात जडपणा जाणवतो. हे एक सुरुवातीचं चिन्ह आहे.
अशी काळजी घ्या
चरबीयुक्त पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते. त्यामुळे असे पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, सोडियम म्हणजेच मीठ आणि जास्त साखर असेल. फक्त समुद्री पदार्थ, चरबी नसलेले किंवा कमी चरबीयुक्त पदार्थ जसे की दूध, चीज आणि दही, संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा.
हृदयरोग
कधी कधी हृदयात काही समस्या असताना पायांना सूज येते. अशा परिस्थितीत ते रक्त योग्यरित्या पंप करू शकत नाही. जर तुमचे हृदय देखील योग्यरित्या रक्त पंप करत नसेल तर ते पाणी आणि मीठ रिटेंशन करू लागते. त्यामुळे पाय सुजतात. जर याच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास हृदयाचे ठोके वेगवान होतात, श्वासोच्छ्वास फुलू लागतो, अशक्तपणा, थकवा, शिंका येणे, भूक कमी होते.
अशी काळजी घ्या
तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर उशीर न करता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :