World Cancer Day 2023 : जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' (World Cancer Day) साजरा केला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता अबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने (UICC) जागतिक कर्करोग दिन हा एक "जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम" म्हणून घोषित केला आहे. याचा अर्थ असा आहे की, जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन कर्करोग रोग ओळखणे, काळजी घेणे आणि रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, तसेच या आजारावर मात करून पुन्हा आयुष्य नव्याने जिंकण्याची आशा बाळगणार्यांच्या उत्साहाला बळकटी देण्याचा देखील आहे. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
या संदर्भात डॉ. नीता घाटे, कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि संस्थापक अध्यक्ष असोसिएशन फॉर टोबॅको use Hazards Awareness & Preventive Measures ATHAPM म्हणतात की, आपल्या देशातील अंदाजे एक तृतीयांश कर्करोग हे तंबाखू सेवनामुळे होतात. यामध्ये तोंडाचा, घशाचा , स्वरयंत्राचा, फुफ्फुसाचा कर्करोग यांचाही समावेश आहे.
तंबाखूमुळे कर्करोगाचा धोका किती?
आपल्याला समजून घेतलं पाहिजे की, आपल्या देशात तंबाखू सेवन हे प्रामुख्यानं धूररहित पद्धतीने होतं. धूररहित स्वरूपातील तंबाखूचा वापर हा आपल्या देशात दुपटीने होतो. त्यामुळे सातत्याने विविध स्तरावर, विविध समाजमाध्यमांद्वारे धूररहित तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी सुद्धा जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे.
सुपारीमुळे कर्करोगाचा धोका किती?
बऱ्याच धूररहित तंबाखूच्या उत्पादनांमध्ये सुपारीचा समावेश आहे. सुपारीसुद्धा कर्करोगासाठी रिस्कफॅक्टर आहे. कोणत्याही स्वरूपातील तंबाखू हानिकारकच आहे.
धूररहित तंबाखूचे प्रकार किती?
बऱ्याचदा गैरसमज असा आढळतो की, धूररहित तंबाखू धूम्रपानापेक्षा कमी हानिकारक आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही स्वरूपातील तंबाखू हा हानिकारकच आहे. कोणत्याही वयात तंबाखू सोडणं हे आरोग्यासाठी फायद्याचंच आहे.
तंबाखू सोडायचीय? 'या' सरकारी नंबरवर कॉल करा
यासाठी सरकारच्या अनेक सुविधा मोफत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये टोल फ्री नॅशनल टोबॅको फ्री हेल्पलाई आहे. 1800 112 356 या नंबरवर मिस कॉल दिल्यास तंबाखूचं व्यसन सुटण्यासाठी समुपदेशन केलं जातं. त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्ती तंबाखू वापरत असेल तर तंबाखू सोडण्यासाठी या सुविधांचा नक्की वापर करून घेतला पाहिजे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :