Cracked Heels : उन्हाळ्यात कडक उन्हामुळे चिडचिड तर होतेच. पण त्याच बरोबर त्वचे संबंधितसुद्धा अनेक वेदना जाणवतात. तसेच, शारीरिक वेदनाही वाढतात. यामधलाच एक त्रास म्हणजे पायांच्या टाचांना भेगा पडणे, पाय दुखू लागणे इ. वेदना जाणवतात. याकडे सहसा आपण लक्ष देत नाही. साधाच त्रास आहे किंवा तात्पुरता त्रास आहे असे सांगून त्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. परंतु, हे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. हा अनुभव साधारणत: प्रत्येक वयोगटातील लोकांना येतो. जेव्हा तुमच्या पायांच्या भेगा अधिक खोलवर जातात तेव्हा उभं राहण्यास, चालण्यास किंवा हिलवर प्रेशर आल्यास वेदना होऊ लागतात. या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा यांनी पायांच्या तळव्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी काही टीप्स दिल्या आहेत. 


या टीप्स फॉलो करून पायांच्या तळव्यांची काळजी घ्या :  


पायांच्या तळव्यांना मॉईश्चराईझ करा :


पायांच्या तळव्यांना वेळोवेळी मॉईश्चरायझर लावा. यामुळे तुमचे तळवे नेहमी सॉफ्ट आणि मुलायम राहतील. 


पायांच्या तळव्याची योग्य काळजी घ्या : 


पायांच्या तळव्यांना नियमित धुवा. तसेच, स्क्रब करा. यामुळे तुमचे तळवे स्वच्छ राहतील. तसेच तळव्याच्या त्वचेवरील मृतपेशी निघून जातील. यासाठी पायांना बाम लावा, क्रिम लावा. पाय वारंवार धुवा. 


पायांवर अधिक ताण येऊ देऊ नका : 


पायांवर जास्त ताण आल्यास तुम्हाला वेदना होतील. या वेदना टाळण्यासाठी सोपा पर्याय म्हणजे उंच सॅंडल घालू नका. तसेच वजनदार सामान उचलू नका. जास्ट टाईट असलेले बूट घालणे टाळा. उंच ठिकाणी जास्त वेळा चढ-उतार करू नका. 


पायांच्या तळव्यांसाठी घरगुती उपाय : 


मध तुमच्या पायांच्या तळव्यांसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. मधामुळे तुमचे पाय मॉईश्चराईझ राहतील. तसेच मधातील गुणधर्मांमुळे तुमच्या पायांच्या तळव्यांना कोणते इन्फेक्शनही होणार नाही. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :