Health Tips : अनेकदा आपल्या घारीचे मोठे खाण्यापिण्या विषयी सतत सूचना करत असतात. शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये म्हणून आपण ओरडा आपल्यापैकी अनेकांना मिळालाच असेल. आपण एखादी गोष्ट खाताना कशाचाही विचार करत नाही. याचा आपल्या आरोग्यावर भरपूर परिणाम होतो. असे काही पदार्थ असतात, ज्यांच्या मिश्रणाने शरीराला हानी पोहोचू शकते. पाणीच नाही तर, काही पदार्थ खाल्यानंतर दूध पिणे देखील शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.


अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन केल्यानंतर दुधाचे सेवन करू नये. असे केल्यास तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांच्या सेवनानंतर दूध चुकूनही पिऊ नये...


लिंबू : लिंबू किंवा लिंबू युक्त पदार्थ खाल्यानंतर दुधाचे सेवन करू नये. यामुळे पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. जर, आधी दूध प्यायले असेल, तर लगेच लिंबापासून तयार केलेली कोणतीही वस्तू सेवन केल्यास गॅसची समस्या होऊ शकते.


मुळा : दूध प्यायल्यानंतर लगेच मुळा खाऊ नये. यामुळे पचन आणि त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे दूध प्यायल्यानंतर मुळ्याचे सेवन करू नये.


मासे : दूध पिण्यापूर्वी किंवा नंतर मासे खाऊ नयेत. दूध आणि मासे एकाचवेळी खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दूध प्यायल्यानंतर मासे खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, याशिवाय तुमचे पचन देखील बिघडू शकते.


लिंबूवर्गीय फळ : दूध प्यायल्यानंतर, लगेच लिंबूवर्गीय फळांचे म्हणजेच अननस, संत्री, मोसंबीचे सेवन करू नये. दूध प्यायल्यानंतर लगेचच लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने, कॅल्शियम फळांमधील एन्झाईम्स शोषून घेते. यामुळे शरीराला पोषण मिळू शकत नाही.


फणस : दूध प्यायल्यानंतर फणसाचे सेवन करू नका. या मिश्रणामुळे त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. इतकंच नाही, तर दूध प्यायल्यानंतर लगेच फणस खाल्ल्याने त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


अंड : दूध व अंडे हे दोन्हीही विरुद्ध पदार्थ आहेत, यालाच विरुद्ध आहार असेही बोलले जाते. त्यामुळे याचे सेवन केल्यास आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतोना दिसून येतो. दुधात जे प्रोटीन असते ते प्राणिजन्य प्रथिने असतात. त्याबरोबर अंडी खाल्ल्याने त्वचेचे विकार आणि पोटाचे आजार होतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


* बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


महत्वाच्या बातम्या :