Health Tips : गरोदरपणात (Pregnancy) आई आणि बाळाचे आरोग्य उत्तम राहणे फार महत्वाचे आहे. यासाठी दररोज चांगला आहार घेण्यासोबतच व्यायाम आणि डक वॉक (Duck Walk) करणे देखील फायदेशीर ठरेल. आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, महिलांनी गरोदरपणात नक्कीच व्यायाम केला पाहिजे, विशेषतः त्यांनी 'डक वॉक'चा सराव केला पाहिजे, कारण ते प्रसुतीसाठी खूप उपयुक्त आहे. जाणून घ्या सविस्तर..


 


गरोदर महिलांसाठी 'डक वॉक' स्क्वॅटिंग व्यायाम का महत्त्वाचा आहे?


'डक वॉक' हा एक विशेष प्रकारचा स्क्वॅटिंग व्यायाम आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वत:ला डक स्टॅन्स प्रमाणे खोल स्क्वॅट स्थितीत खाली ठेवते. या व्यायामामध्ये जमिनीवर पाय आणि पाठ सरळ ठेवून गुडघ्यात खाली वाकून बसावे, यानंतर चालण्याचा प्रयत्न करावा. 'अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट'च्या मते, गरोदरपणात सक्रिय राहणे खूप गरजेचे आहे. जर गरोदरपणात तुमच्या बाळाचे डोके खालच्या दिशेने आले असेल तर तुम्हाला या व्यायामाचा खूप फायदा होईल. 'ओन्ली माय हेल्थ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, गरोदरपणात डक वॉक हा तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवणे खूप फायदेशीर ठरेल, असं म्हटलंय.


 


गर्भवती महिलेने स्वतःला सक्रिय ठेवणे खूप महत्वाचे


गरोदरात व्यायाम करणे आणि आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच गरोदरपणात जास्त वजन वाढण्यावरही नियंत्रण ठेवावे लागते. गर्भवती महिलेने स्वतःला शक्य तितके सक्रिय ठेवणे खूप महत्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांनी अधिक सक्रिय राहिल्याने मधुमेह, प्रीक्लेम्पसिया आणि सिझेरियनचा धोका कमी होतो.


 


'डक वॉक'चे फायदे


बदकप्रमाणे चालणे म्हणजेच 'डक वॉक' हे पेल्विक फ्लोर स्नायूंना सक्रिय करते. जे गर्भधारणेदरम्यान गर्भाशय आणि पेल्विक अवयवांना आधार देण्यामध्ये विशेष भूमिका बजावते. या व्यायामामुळे स्नायूंना बळकटी आल्याने तुम्ही शौचाच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. त्यामुळे गर्भधारणाही चांगली होते. गर्भधारणेमुळे स्नायू कडक होणे आणि लवचिकता कमी होऊ शकते. डक वॉक नितंब, मांड्या आणि पाठीच्या खालच्या भागात लवचिकता राखण्यास किंवा सुधारण्यास मदत करते.


 


सामान्य प्रसूतीसाठी उपयुक्त


जे विशेषतः प्रसूती वेदने दरम्यान उपयुक्त ठरू शकते. डक वॉक करून तुम्ही प्रसूती वेदना टाळू शकता. हे स्त्रीच्या ओटीपोटाचा आउटलेट उघडण्यास मदत करते. गर्भधारणेदरम्यान, या व्यायामामुळे शरीर लवचिक बनते ज्यामुळे तुम्हाला प्रसूती वेदना सहन करता येतात आणि सामान्य प्रसूती होते. असं तज्ज्ञांचं मत आहे.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत