Health Tips : बदलत्या जीवनशैली आणि हवामानामुळे संधीवात तसेच सांधेदुखीमुळे अनेक वेदना जाणवू लागतात. रुग्णांना जागतिक स्तरावर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी वेदना ही सर्वात सामान्य बाब आहे. WHO च्या अंदाजानुसार तीव्र वेदना असलेल्या 80% रुग्णांना कधीही पुरेसे उपचार मिळत नाहीत. जर तुम्हाला तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस दुखण्याचा त्रास असेल तर हा एक प्रकारचा गंभीर आजार असू शकतो.
शरीरातील दुखण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. यामध्ये कॅल्शियमची कमतरता जळजळ होणे यांसारखी कारणं आहेत. जाणून घेऊयात कोणत्या आजाराची कोणती लक्षणं आहेत.
Chronic आजाराची लक्षणं कोणती?
Chronic हा आजार जवळपास 60 टक्के लोकांना होतो. यामध्ये रूग्णांना जळजळ होणे, पोटात आग येणे, घाम येणे, अंग ताठ होणे यांसारखी लक्षणं जाणवतात.
अशा कोणत्या टेस्ट आहेत ज्या हे आजार आणि त्यावरील उपचार ओळखू शकतात?
1. C-Reactive Protein Qualitative : सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन क्वालिटेटिव्ह शरीरातील कोणत्याही जळजळीवर लक्ष ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे वेदना होऊ शकते. उच्च पातळीची वेदना ही जास्त त्रासदायक असते.
2. Calcium : शरीरातील कमी कॅल्शियमच्या प्रमाणामुळे अंगदुखी, शरीराला चटके लागणे, वेदना होणे यांसारखी लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे तुमच्या हातात, मनगटात, पायांत या वेदना जाणवतात. त्यामुळे तुमच्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल तर वेळी कॅल्शियमयुक्त फळं, पालेभाज्या खा.
3. Rheumatoid Factor Qualitative : ही स्वयंप्रतिरोधक रोगाची लक्षणे आहेत. संधिवात, स्जोग्रेन्स सिंड्रोम यामुळे तुमच्या शरीरात तीव्र वेदना होतात.
4. Uric Acid : तुमच्या शरीरातील उच्च युरिक एॅसिडमुळे तुमच्या पायांना तडे जातात. ही वेदना सुद्धा फार वेदनादायी असते.
महत्वाच्या बातम्या :