Health Tips : जसजसा हवामानत बदल होतो तसतसा बहुतेक लोकांना सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. मात्र, असे असले तरी, वाढत्या वयाबरोबर हाडे आणि सांध्यातील वेदना दिसून येतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रासही होऊ शकतो. या आजारात सांध्यांमध्ये सौम्य ते तीव्र वेदना होऊ शकतात. हा आजार वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मात्र, आता हा त्रास तरूणांमध्येही दिसू लागला आहे.  


शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढली की सांधेदुखीचा त्रास होतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा यूरिक ऍसिड सांध्याच्या हाडांमध्ये प्रवेश करते तेव्हा क्रिस्टलीय संरचना विकसित होते. या सांध्यांना आधार देणारी गादी हळूहळू पातळ करतात. त्यामुळे सांधे दुखू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. या ठिकाणी काही पानं वापरून तुम्ही सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. ही पाने नेमकी कोणती या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


पुदीना पाने (Mint Leaves)


चटणी बनवण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा विशेष वापर केला जातो. पण पुदिन्याची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पुदिन्याच्या पानांमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि फोलेट आढळतात. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म लघवीतील प्युरीन्स काढून सांध्यांची जळजळ कमी करतात.


कोथिंबीर (Coriander)


कोथिंबीरशिवाय भाजीला चव लागत नाही. हिरव्या कोथिंबीरच्या सौम्य सुगंधाने भाजीची चव पूर्णपणे बदलते. कोथिंबीर रक्तातील साखर नियंत्रित करते. कोथिंबीरमध्ये थायमिन, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. याबरोबरच रक्तातील यूरिक अॅसिड आणि क्रिएटिनिनची पातळीही कमी करते.


कोरफड (Aloevera)


कोरफड हा त्वचेसाठी तर फायदेशीर आहेच. पण कोरफड हा सांधेदुखीवरही फायदेशीर आहे. कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज कमी होते आणि वेदना कमी होते. कोरफड सामान्यतः सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा क्षोभ, पुरळ आणि मुरुम फोडण्यासाठी वापरले जाते. पण कोरफडचा रस प्यायल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हे उपाय करून सांधेदुखीच्या त्रासावर आराम मिळवू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी