Health Tips : सध्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूच्या (H1N1) रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृषीने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रकरणांची दखल घेऊन, BMC ने अलीकडेच नागरिकांना H1N1 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्वाईन फ्लू नेमका कशामुळे होतो? याची लक्षणं कोणती आणि यावर उपाय काय? या संदर्भात न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे मुख्य पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजेश बेंद्रे यांनी काही महत्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.
स्वाईन फ्लू कशामुळे होतो?
स्वाईन फ्लू, ज्याला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित शिंकतो किंवा खोकतो तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक,तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसांत संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.
स्वाईन फ्लूची लक्षणं कोणती?
स्वाईन फ्लूच्या आजारात सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या ही काही सामान्य लक्षणे दिसतात. यामुळे घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यांसारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे, कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणे टाळणे आणि सण-उत्सवादरम्यान योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे योग्य आहे.
यावर उपचार कोणते?
H1N1 विषाणूच्या उद्रेकादरम्यान, BMC आरोग्य तज्ञांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार, इत्यादी सह-विकृती असलेल्या रुग्णांना अधिक सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे.
H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळे केले पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या :