Kidney Health : निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्व अवयव निरोगी ठेवणं महत्वाचं आहे. शरीरातला एकही अवयव कमकुवत झाला किंवा आजारी पडला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. शरीरातील असाच एक महत्त्वाचा अवयव म्हणजे मूत्रपिंड (Kidney). किडनी शरीर साफ ठेवण्यात मदत करते. किडनीचं आरोग्य जपणं फार आवश्यक आहे, अन्यथा धोकादायक आजारांना बळी पडण्याची शक्यत असते. त्यामुळे आपल्याला वेळीच सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
किडनी निरोगी आणि स्वस्थ ठेवणं फार आवश्यक आहे. यासाठी लिंबी फार उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं. लिंबामुळे किडनी डिटॉक्स होण्यास मदत होते. किडनीचं आरोग्य जपण्यासाठी लिंबाचं सेवन कसं कराल जाणून घ्या.
मिंट लेमोनेड (Lemon with Mint)
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुदिना आणि लिंबूपासून तयार केलेलं पेय सेवन करणं फायदेशीर ठरेल. हे पेय तयार करण्यासाठी, एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये लिंबाचा रस, काही पुदिन्याची पाने आणि थोडी साखर घालून मिसळा. या पेयाचं सेवन केल्याने तुमची किडनी निरोगी राहण्यास मदत होते.
मसाला लिंबू सोडा (Masala Lemon Soda)
किडनीचं आरोग्य जपण्यासाठी तुम्ही मसाला लिंबू सोड्याचं सेवन करु शकता. यामुळे तुमची किडनी निरोगी राहिल. हे तयार करण्यासाठी, एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला आणि सोडा घालून मिसळा. आता हे तयार पेय प्या. याच्या मदतीने तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता.
कोकोनट शिकंजी (Coconut Shikanji)
किडनी निरोगी ठेवण्यासाठी नारळ शिंकजी खूप लाभदायी ठरते. यासाठी एका ग्लासमध्ये नारळ पाणी घ्या. या पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. याचं सेवन केल्याने तुम्हाला किडनी निरोगी ठेवण्यात मदत होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :