Health Tips : शरीराला सूज येणं ही सामान्य बाब आहे. मात्र, जर तुमच्या शरीराला वारंवार सूज येत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. शरीरात सूज येणं हे अनेक रोगांचे लक्षण आहे. कधीकधी लोक अशा प्रकारची सूज सहज हलक्यात घेतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हाता-पायांवर सूज येणे, डोळ्यांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे ही गंभीर आजारांची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल तर सर्वात आधी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सूज का येते?
खरंतर, शरीरात सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की हाडे किंवा स्नायूंमध्ये सतत दुखणे किंवा शरीरातील काही गंभीर आजार. शरीरात सूज येण्याचे मुख्य कारण रक्ताची कमतरता असू शकते. अनेक प्रकरणांमध्ये असे देखील घडते की शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक भागात सूज येते. रक्ताच्या कमतरतेमुळे, डोळे आणि पायांवर सूज देखील दिसू शकते.
कोणते रोग होऊ शकतात?
शरीरात सूज आल्याने गंभीर आजार होऊ शकतात. जसे की, किडनीचा त्रास, थायरॉईडमुळे सूज येणे, कधी कधी थायरॉईड अचानक कमी होऊन त्यामुळे शरीरात सूज येते. कमी थायरॉईड पातळी देखील सूज मुख्य कारण असू शकते. कधीकधी कमकुवत हृदयामुळे देखील सूज येते. यकृतातील काही समस्यांमुळे शरीरात सूज येते. अशा परिस्थितीत, आपण अशा सूज दुर्लक्ष करू नये.
काही घरगुती उपाय
जर तुमच्या शरीरात नेहमी सूज येत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. जसे की, अनवाणी चालू नये. झोपण्यापूर्वी पायांना मोहरीचे तेल लावा. परंतु जर तुम्हाला सूज येत असेल तर तुम्ही प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :