Health Tips For Men : बदलत्या जीवनशैली आणि वाढत्या तणावामुळे अनेकदा आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी ज्या तपासण्या नियमित करायला हव्यात त्यासुद्धा आपण करणे टाळतो. परिणामत: गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. या व्यतिरिक्त अनेक आरोग्य सर्वेक्षणांमधून असेही दिसून आले आहे की, महिलांच्या तुलनेने पुरुष कमी प्रमाणात प्रतिबंधात्मक तपासण्या करून घेतात.


तंदुरूस्त शरीर आणि निरोगी आरोग्या लाभण्यासाठी योग्य वेळी आरोग्य चाचणी करून घेणे गरजेचे आहे. या संदर्भात, मुंबईतील न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स, मुख्य पॅथोलॉजिस्ट डॉ. राजेश बेंद्रे यांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य वेळी कोणत्या तपासण्या करून घेणे आवश्यक आहे हे सांगितले आहे. 


या तपासण्या योग्य वेळी करणे : 


रक्तदाबावर लक्ष ठेवणे : रक्तदाब हा कमी वेगाने मृत्यूच्या खाईत ढकलणारा आझार आहे. हायपरटेन्शनसाठी रक्तदाब हे एक प्रमुख कारण आहे. तसेच यामुळे हृदय, फुफ्फुस, मेंदू, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांना अपाय होऊ शकतो. रक्तदाबाची तपासणी ही एक महत्त्वाची तपासणी आणि अत्यंत सोपी, वेदनारहित असून त्याचे निष्कर्ष काही मिनिटांत समजतात. निरोगी रक्तदाब हा 120/80 एमएमएचजी इतका असतो. 


रक्तातील साखरेची तपासणी : ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे त्यांनी रक्तातील साखरेच्या पातळीवर आवश्यक तेवढे नियंत्रण ठेवले पाहिजे. म्हणून रक्तातील साखरेची नियमित चाचणी केल्याने रक्तातील साखर वाढल्यास त्याचे निदान करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. तसेच सुरुवातीच्या टप्प्यातच, जीवनशैलीमध्ये बदल करून आणि उपचार घेऊन मधुमेहास प्रतिबंध करता येतो. ही तीन महिन्यातील सरासरी रक्त शर्करा पातळी असते. ही चाचणी न्याहारीच्या आधी आणि नंतर केली जाते. 


लिपिड प्रोफाइल : रक्तातील कोलेस्टरॉल व ट्रायग्लिसराइडची पातळी मोजण्यास ही चाचणी मदत करते. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी डिपॉझिट साचण्याची वाढती जोखीम दाखवून देण्यास ही चाचणी मदत करते. या डिपॉझिट्समुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा रक्तवाहिन्या निमुळत्या होऊ शकतात. परिणामी, हृदयातील रक्तवाहिन्यांचा आजार होण्याची शक्यता असते. चाळीशीच्या वर वय असलेल्या व्यक्तींनी दर पाच वर्षांतून एकदा लिपिड प्रोफाइल चाचणी करून घेण्यासाठी डॉक्टरची भेट घ्यावी. एखाद्या व्यक्तीला हृदयविकार, मधुमेह किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार असतील तर ही चाचणी नियमितपणे करून घ्यावी.


कलोनोस्कोपी : कलोनोस्कोपी म्हणजे आतडाच्याच्या कर्करोगाची तपासणी. ज्यांना आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता आहे आणि ज्यांनी 40 किंवा त्याहून अधिक वय झाल्यावर कलोनोस्कोपी करण्यास सांगितली आहे, त्यांनी ही तपासणी करून घ्यावी. बहुधा, विष्ठेची तपासणी आणि ऑकल्ट ब्लडवर भर देऊन करण्यात यावी, फ्लेक्सिबल सिग्मॉइडोस्कोपी आणि / किंवा कलोनोस्कोपी आणि /किंवा सीटी कलोनोग्राफी दर पाच ते दहा वर्षांनी करावी. ज्यांना जोखीम जास्त आहे, त्यांना कलोनोस्कोपी अधिक वेळा करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.


नेत्रतपासणी : वयाच्या चाळीशीनंतर दृष्टी कमजोर होत जाते. परिणामी बहुतेकांना चष्मा लागतो. अशा वेळी 40 वर्षांवरील पुरुषांनी दर दोन वर्षांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. वाढत्या वयानुसार किंवा व्यक्तीला दृष्टी कमकुवत झाल्याचे जाणवत असेल तर नेत्रतपासणीची वारंवारता वाढत जाते. या व्यतिरिक्त मधुमेहींनी डायबेटिक रेटिनोपथीमुळे होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेव्यासाठी दर वर्षी नेत्र तपासणी करून घ्यावी.


तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जर तुम्ही योग्य वयात योग्य आरोग्य तपासण्या केल्या तर यामुळे उद्भवणारे गंभीर आजार तुम्हाला वेळीच रोखता येतात. 


महत्वाच्या बातम्या :