Symptoms Of Heart Attack : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या कामाच्या ताणाबरोबरच आजाराकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. खरंतर, अनेक विकार आपल्याला होत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि हे आजार वाढत जातात. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका ही आता सामान्य बाब झाली आहे. खरंतर, हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी आपले शरीर आपल्याला अनेक संकेत देत असतात. या संकेतांकडे जर तुम्ही गांभीर्याने लक्ष दिले तर तुम्ही हा धोका टाळू शकता. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये सारखीच असतात, परंतु महिलांमध्ये ही लक्षणे ओळखणे पुरुषांपेक्षा अधिक कठीण असते.


आजच्या काळात अगदी 24 वर्षांच्या तरूणालाही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागतोय. हृदयविकाराचा झटका कोणालाही कुठेही आणि कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. पण हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी तुमच्या शरीरात काही विशेष बदल घडायला लागतात. किंवा तुमचे शरीर तुम्हाला सतर्क करू लागते असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. हे संकेत ओळखून तुम्ही वेळीच सावधगिरी बाळगू शकता. हृदयविकाराची लक्षणं नेमकी कोणती हे जाणून घ्या.  


तुम्हाला ही लक्षणे दिसतील 



  • छातीत जळजळ होण्याची समस्या, ज्याकडे लोक आम्लपित्त म्हणून दुर्लक्ष करतात.

  • धाप लागणे.

  • सतत थकवा जाणवणे. 

  • चक्कर येणे.

  • अनियंत्रित रक्तदाब. 

  • छातीत दुखणे.

  • छातीत सतत धडधडणे. 



 सौम्य हृदयविकाराचा झटका


छातीत सोम्य दुखणे, अस्वस्थता निर्माण होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. ज्याकडे लोक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. तसेच यावर उपाय म्हणून काही लोक पेन किलरच्या गोळ्या खाऊन झोपतात. परंतु ही सामान्य समस्या नसून हा सौम्य हृदयविकाराचा झटका असू शकतो. ज्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. हृदयविकाराच्या झटक्याची जी लक्षणे बहुतेकांना माहीत असतात, जसे की छातीत तीव्र वेदना होणे, चक्कर येणे आणि पडणे इ. ही सर्व लक्षणे तीव्र झटका आल्यानंतर येतात.


स्त्रियांमध्ये गोंधळ निर्माण होणे
 
स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुषांइतकी स्पष्ट नसतात. हार्मोनल बदलांमुळे वारंवार दिसणारी लक्षणं ही आहेत. त्यामुळे महिलांमध्ये सायलेंट हार्ट अटॅक आणि हार्मोनल बदल या लक्षणांबाबत संभ्रम आहे. तथापि, स्त्रियांमध्ये देखील पुरुषांप्रमाणेच हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसतात.


परंतु जेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागतात, तुम्हाला छातीत घट्टपणा जाणवतो आणि तीव्र वेदना होतात, श्वास घेण्यास त्रास होतो यांसारखी जर लक्षणं तुम्हाला जाणवू लागतात. अशा वेळी तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.   


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :