Pregnancy Tips : गर्भधारणेचा काळ खूप नाजूक असतो. या काळात महिलांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, बाळाला आईच्या आहारातूनच पोषण मिळते. ज्यापासून बाळाच विकास होऊ शकतो. अनेक महिलांना मासे खायला आवडतात, पण या काळात त्यांनी माशांचा आहारात समावेश करावा की नाही याबाबत संभ्रम निर्माण होतो. 


आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, मासे खूप पौष्टिक असतात आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारात माशांचा समावेश जरूर करावा. पण गर्भवती महिला सर्व प्रकारचे मासे खाऊ शकतात का? हे जाणून घेऊयात. 


योग्य निवड करा


गर्भधारणेदरम्यान तुम्ही मासे खाऊ शकता. परंतु, तुम्हाला ते अतिशय काळजीपूर्वक निवडावे लागतील. तसेच त्याचे प्रमाणही कमी करावे लागेल. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या बाळाला अनेक पोषक तत्वांची गरज असते. जे माशांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. 


प्रमाण किती असावे ? 


FDA आणि EPA च्या मते, दर आठवड्याला 226 ते 340 ग्रॅम मासे दोन ते तीन सर्व्हिंगमध्ये खाऊ शकतात. स्तनपान करणाऱ्या आईने याच प्रमाणात मासे खावेत. 


यासाठी मासे खावे 


माशाच्या तेलात ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात. जे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात. Omega-3 उशिरा गर्भधारणा CNS वाढ आणि गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. गरोदर महिलांना मासे फक्त कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच गरोदर महिलांनी त्यांच्या आहारात माशांच्या प्रमाणाची काळजी घेतली पाहिजे.


काय आहेत फायदे ? 


माशांमध्ये प्रोटीन असते. जे गर्भाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे अमीनो आम्ल असते. तसेच माशांमधून जे प्रोटीन मिळते त्यातून तुमच्या बाळाचे केस, हाडे, त्वचा आणि स्नायूंसाठी पेशी तयार करण्यात मदत होते.
त्याचबरोबर मासे खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :