Hair Growth Tips : आपले केस मजबूत आणि सुंदर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. महिला असो वा पुरुष प्रत्येक जण केसांची योग्य निगा राखण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना केस गळण्याची समस्या जाणवते. केस लांब आणि चमकदार होण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करुन पाहतो. उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण उन्हामुळे घाम येऊन केस लवकर खराब होतात. अशा धुळीमुळे केसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.


केस गळती थांबवण्यासाठी दररोज फक्त 5 मिनिटे वेळ काढून 'हे' करा म्हणजे केस गळतीपासून सुटका मिळेल.


केसांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
केसगळतीबद्दल महत्त्वाची गोष्ट तुम्हांला माहित नसेल की, सामान्यपणे निरोगी व्यक्तीचे एका दिवसात 70 ते 100 केस गळतात. हे सामान्य आहे. त्यामुळे केस गळण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र जर तुम्ही तुमच्या केसांमध्ये हात घातला आणि जर मूठभर केस तुमच्या गळून येत असतील तर तुम्हाला याकडे लवकरच लक्ष देण्याची गरज आहे. याचाच अर्थ असा की तुम्हांला तुमच्या केसांना पोषण देण्याची आणि देखभाल करण्याची गरज आहे.


फक्त 5 मिनिटे करा 'हे' काम
तुमच्या केसांच्या लांबीनुसार दररोज कोरफडीचे पान घ्या. याचे जेल काढा. कोरफडीच्या पानाच्या आतील गर काढून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात कोरफडीचा गर आणि थोडे पाणी घालून हे एकत्र वाटून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून काचेच्या बरणीत भरा. या प्रकारे कोरफडीचे जेल तयार होईल. तुम्ही हे जेल रोज केसांवर वापरू शकता. हे कोरफडीचे जेल पाच ते सहा दिवस ताजे राहते. तुम्ही कोरफडीचे रोप घरात किंवा गॅलरीमध्ये एका भांड्यात लावू शकता. यामुळे तुम्हांला कोरफड सहज उपलब्ध होईल आणि तुम्हाला कोरफडीवर पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.


असा करा वापर
रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांना एलोवेरा जेल लावू शकता. जेल सुकल्यावर तुम्ही आरामात झोपू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास सकाळी आंघोळीच्या 20 मिनिटे आधी कोरफडीचे जेल केसांना लावा आणि नंतर शॅम्पू करा.


जर तुमचे केस खूपच कोरडे असतील तर तुम्ही हे जेल शॅम्पूनंतर केसांना कंडिशनर म्हणून वापरू शकता. शॅम्पू केल्यानंतर, हे जेल केसांना लावा आणि नंतर दोन मिनिटांनी केस पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळेल. मात्र केसगळती थांबवायची असेल तर हे जेल रात्री किंवा शॅम्पूच्या 20 ते  30 मिनिटे आधी लावा आणि त्यानंतर धुवा.



महत्वाच्या बातम्या : 





Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator