Ice Cream : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढलेला पाहायला मिळत आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. घरात किंवा ऑफीसमध्ये लोक पंखा, कूलर किंवा एसीच्या बाजूची जागा सोडताना दिसत नाही. लोक उन्हातून घराच्या बाहेर जाणं टाळण्याचाही प्रयत्न करतात. काही जण थंड पदार्थ खाऊन गरमीपासून आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात. कडक उन्हापासून आराम मिळावा म्हणून लोक आईस्क्रीम खाताना दिसतात. उन्हाळ्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण आईस्क्रीम खाताना दिसतील. 


उन्हाळ्यात बहुतेक घरांमध्ये जेवणानंतर आईस्क्रीम खाल्लं जातं. आईस्क्रीम हे तर लहान मुलांचा आवडता पदार्थ आहे. लोकांना वाटते की आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळेल आणि उष्णतेपासून आराम मिळेल. पण तुम्हाला माहित आहे का की आईस्क्रीम खायला थंड असले तरी त्याचा प्रभाव गरम असतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं आरोग्याला वाईट ठरू शकतं. उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानं पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळ्यात आईस्क्रीम खावं की नाही आणि आईस्क्रीम खाण्याचा सर्वोत्तम ऋतू कोणता हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या.


उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं योग्य आहे का?
उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी लोक अधिक आईस्क्रीम खातात. लोकांना वाटते की आईस्क्रीम खाल्ल्याने शरीरातील उष्णता निघून जाईल. तुमचाही असाच विचार असेल तर हे चुकीचं आहे. आईस्क्रीम खाण्यास थंड असले तरी त्याच्या प्रभाव गरम आहे. आइस्क्रीममध्ये अधिक प्रमाणात फॅट असल्याने त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळेच आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अधिक तहान लागते. उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानं तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात आईस्क्रीममुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. आईस्क्रीम खाल्ल्यानं घसा खवखवणे किंवा सर्दी होऊ शकते. 


हिवाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यास काय होते?
हिवाळ्यात बरेच लोक आईस्क्रीम खात नाहीत. आईस्क्रीम खाल्ल्यानं घसा खराब होईल असा अनेकांचा समज आहे, पण तसे अजिबात नाही. हिवाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दीमुळे होणारी घसादुखीला आइस्क्रीम खाल्ल्यानं आराम मिळतो. आइस्क्रीममध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. म्हणूनच हिवाळ्यातही तुम्ही न घाबरता आईस्क्रीम खाऊ शकता. हे खाल्ल्याने सर्दी होणार नाही आणि घशालाही आराम मिळेल.


आईस्क्रीम खाण्यासाठी उत्तम ऋुतू कोणता?
तुम्ही कोणत्याही ऋतूत आइस्क्रीम खाऊ शकता. परंतु जर तुम्ही हलक्या उन्हाळ्यात आणि हलक्या हिवाळ्यात आईस्क्रीम खाल्ले तर यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. उन्हाळात किंवा उन्हाळ्यात कधीही आईस्क्रीम खाऊ नका. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :