Heat Wave : अलिकडे तापमानात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं, गरजेचं आहे. आपण उन्हात बाहेर पडताना डोके झाकण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच सनस्क्रिम लावून त्वचेचीही काळजी घेतो त्याचप्रमाणे डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात डोळ्यांना ऍलर्जी आणि इन्फेक्शन होण्याचे प्रमाण सामान्य आहे. मात्र उन्हाळ्यात डोळ्यांच्या काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.
नवी दिल्लीतील व्हिजन आय सेंटर वैद्यकीय संचालक डॉ. तुषार ग्रोव्हर यांनी सांगितलं आहे की, 'उन्हाळ्यामध्ये अॅलर्जी, संक्रमण होण्याची तसेच डोळे कोरडे होण्याची समस्या जाणवते. यामुळे उन्हाळ्यात आपल्याला डोळ्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अशा समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैद्यकीय सल्ला वेळेवर न पाळल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. याशिवाय हवेतील प्रदूषणाची वाढलेली पातळी हेही मोठं आव्हान आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. संसर्ग किंवा ऍलर्जीच्या लक्षणांमध्ये डोळ्यांमध्ये खाज सुटणे, लालसरपणा किंवा जळजळ होणे अशा समस्या जाणवू शकतात, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
आग्रा येथील उजाला सिग्नस रेनबो हॉस्पिटलमधील नेत्ररोग सल्लागार डॉ. चिकिर्शा जैन यांनी यावबत अधिक माहिती देताना सांगतले आहे की, 'उन्हाळ्यात आपले डोळे संवेदनशील होतात, त्यामुळे त्यांची जास्ता काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्गाची लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. अन्यथा यामुळे तुमचे डोळे खराब होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच डोळ्यांची योग्या काळजी घ्या.'
उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
- डोळ्यांना आराम मिळण्यासाठी किमान सात ते आठ तास झोप घेणे गरजेचं आहे.
- डोळे कोरडे होण्याची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.
- डोळे तीन ते चार वेळी थंड पाण्याने धुवा.
- घरातून बाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करा.
- रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Hair Growth : केस लांब आणि चमकदार बनवायचे आहेत? करा 'हा' घरगुती उपाय
- Health Care : चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी; होऊ शकतात गंभीर आजार
- Health Tips :वजन वाढेल, दातही खराब होतील! कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने पोहोचेल आरोग्याला हानी, जाणून घ्या..
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )