Benefts of Anjeer : अंजीर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, प्रथिने, फायबर तसेच अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. सुके अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. अंजीर खाणे तुमच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया.
1. बद्धकोष्ठता समस्या दूर करते : जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर अंजीर खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते आणि फायबर पचन सुधारते तसेच अॅसिडिटी दूर करते.
2. वजन कमी होते : लोक वजन कमी करण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात. कोणी योगासने करतात, कोणी व्यायाम करतात, सायकल चालवतात. अंजीर विशेषतः वजन कमी करण्यास मदत करते. याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे.
3. पोषक तत्वांचे शोषण : अंजीर सकाळी अवश्य खावे. यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने शरीर त्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे पूर्णपणे शोषून घेते.
4. रक्तदाब नियंत्रण : अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येतो. यासोबतच हे आपल्या हृदयाचे आरोग्य देखील राखते.
5. हाडे मजबूत बनवा : कॅल्शियम हाडे मजबूत करतो. अंजीरमध्ये कॅल्शियम देखील आढळते, जे आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.
अंजीर असे खा
जसे भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले असते, त्याचप्रमाणे भिजवलेले अंजीर खाणे देखील आरोग्यासाठी चांगले असते.रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन अंजीर अर्धा कप पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha