Health : "अर्बन लाईफ स्टाईलमध्ये आणखी लठ्ठपणा वाढतोय. कॅलरी काउंट मेंटेन ठेवण्यासाठी आपण तयारी करतोय" असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. तर "जिभेला वाईट ते चांगलं, चांगलं ते वाईट असं झालंय" असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. वर्ल्ड चाईल्ड ओबेसिटी (लठ्ठपणा) दिना निमित्ताने जनरेशन एक्सेल ओबेसिटी फाउंडेशन मार्फत आज मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद सुरू होता, यावेळी डॉ. संजय बोरुडे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला.लठ्ठपणा संदर्भात आणखी काय म्हणाले?जाणून घ्या..



कॅलरी काउंट मेंटेन ठेवण्यासाठी आपण आता तयारी करतोय - फडणवीस


या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, कॅलरी काउंट मेंटेन ठेवण्यासाठी आपण आता तयारी करतोय. चौपाटीवर आणि फूड स्टॉलवर पदार्थात कॅलरी किती? यासाठी बोर्ड लावा अशा गोष्टींसाठी प्रयत्न केले. भरड धान्यातून सुपर फूड कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय. आताची पिढी खूप जागृत आहे. आई-मुलांनी या संदर्भात लक्ष दिलं पाहिजेत असंही म्हणाले. पुढे फडणवीस म्हणाले... लठ्ठपणा संदर्भात दोन प्रकार पाहायला मिळतात. अर्बन लाईफ स्टाईलमध्ये आणखी लठ्ठपणा वाढतोय. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेचा यावर उपचार घ्यायला फायदा होतोय. या संदर्भात केंद्र सरकार देखील खूप उपाय योजना करत आहेत. लठ्ठपणा संदर्भात एक सर्व्हे झाला आणि यावरील उपचार वाढले. विशेष म्हणजे सरकारने प्रत्येक शाळेत दोन शिक्षक ट्रेन करायचे आणि विद्यार्थी यांच्यावर लक्ष ठेवून काऊंन्सिलिंग करायची. 



राज्य आणि केंद्र सरकारने पिटी तास अनिवार्य केलंय - फडणवीस


फडणवीस म्हणतात, देशात लठ्ठपणा संदर्भात प्रोग्राम हातात घ्यायचा पूर्ण प्रयत्न सुरु आहे. आता विशेषतः राज्य आणि केंद्र सरकारने पिटी तास अनिवार्य केले आहे. विना मैदानाची शाळा सुरु करता येणार नाही. अनेक मुलं मैदानात जात नाहीत, डिजिटल गेम खेळतात. त्यामुळे खेलो इंडिया सारखी मोहीम सुरु झालीय. राष्ट्रीय खेळात अनेक मुलांचं सहभाग वाढत आहे. पालकांना ही आता वाटतं खेळात मुलांचं करिअर होतंय.


 


जिभेला वाईट ते चांगलं, चांगलं ते वाईट असं झालंय - राज ठाकरे


लठ्ठपणा संदर्भात राज ठाकरे म्हणतात, गेम खेळ पाहिजेत. डॉक्टर माझ्या आयुष्यात आले, आणि माझं वजन वाढू लागलं. मी रोज बॅडमिंटन खेळतो त्यातून 470 कॅलरी कमी होतात. त्यामुळे मी योग्य मार्गांवर आहे. लठ्ठपणा आजार आहे हे पालकांना कळायला मार्ग नाही. डॉक्टरांनी यासाठी काही शोधलं पाहिजे. बाहेरचे फास्ट फूड आल्यावर हे सगळं वाढलंय. जिभेला वाईट ते चांगलं, चांगलं ते वाईट असं झालंय. जपानमध्ये का कुठे तरी डब्बेच मुलांना आणू देत नाही शाळेतच मुलांना जेवण बनवलं जातं, सर्व मिळून शाळेतच चांगलं अन्न मिळालं तर कशाची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जायचं आहे आणि मी पण चायनीजची ऑर्डर दिलीय... असं वक्तव्य राज ठाकरे यांनी करताच एकच हशा पिकला.


 



 


लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय?


लठ्ठपणा ही एक समस्या आहे, जी आपल्यासोबत इतर अनेक आजार घेऊन येते. लठ्ठपणाची अनेक कारणे असू शकतात. अधिक वजन किंवा लठ्ठपणाची समस्या ही आरोग्याची गंभीर चिंता मानली जाते. यामुळे अनेक प्रकारच्या विविध आजारांचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ सर्व लोकांना त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. संशोधकांनी सांगितले की, ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्यांना मधुमेह, हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या दीर्घकालीन आजारांचा आणि जीवघेण्या समस्यांचा धोका जास्त असतो. तुमचे वजन जितके जास्त होईल तितका गुडघ्यावर अतिरिक्त दबाव वाढेल, ज्यामुळे संधिवात सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या विश्लेषणानुसार, जगभरात लठ्ठ मुले, किशोरवयीन आणि प्रौढांची एकूण संख्या एक अब्ज पेक्षा जास्त झाली आहे. तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्येला बळी पडत आहात का? ही स्थिती तुम्हाला जुनाट आजार होण्याचा धोका वाढवत नाही तर अनेक रोगांच्या विकासाचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे लठ्ठपणा किंवा वजन वाढण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक बनते.


 


हेही वाचा >>>


Coronavirus : कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरियंटमुळे चिंता वाढली, लक्षणे कोणती? जाणून घ्या