मुंबई : कोरोनाने (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढल्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. जगभरात कोरोनाच्या ओमयक्रॉन व्हेरियंटचे दोन नवे सब-व्हेरियंट आढळले आहे. या सब-व्हेरियंटला फ्लर्ट असं नाव देण्यात आलं आहे. फ्लर्ट व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा देशासह जगात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या फ्लर्ट व्हेरियंटची लक्षणे (Corona New Variant FLiRT Symptoms) कोणती, हे सविस्तर वाचा.

Continues below advertisement

देशात कोणत्या राज्यात नवीन व्हेरियंटचा प्रसार?

भारतातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय INSACOGच्या (SARS CoV-2 Genomics Consortium)  डेटानुसार, KP.1 या नवीन प्रकाराची एकूण 34 प्रकरणे भारतात आतापर्यंत आढळली आहेत, त्यापैकी 23 रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळले आहेत. तर KP.1 चा एक रुग्ण गोव्यात, गुजरातमध्ये दोन, महाराष्ट्रात चार, राजस्थानमध्ये दोन आणि उत्तराखंडमध्ये एक रुग्ण आढळून आले आहेत. 

नव्या फ्लर्ट व्हेरियंटमुळे देशाची चिंता वाढली

आकडेवारीनुसार, भारतात KP.2 व्हेरियंटच्या एकूण 290 प्रकरणांची नोंद झाली आहे. KP.2 च्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी असून येथे 148 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिल्लीत एक, गोव्यात 12, गुजरातमध्ये 23, हरियाणामध्ये 3, कर्नाटकात 4, मध्य प्रदेशात 1, ओडिशामध्ये 17, राजस्थानमध्ये 21, उत्तर प्रदेशमध्ये 8, उत्तराखंडमध्ये 16 आणि पश्चिम बंगालमध्ये 36 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Continues below advertisement

सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा उद्रेक

सिंगापूरमध्ये कोविड-19 ची नवीन लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सिंगापूर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 11 मे पर्यंत सिंगापूरमध्ये 25,900 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. सिंगापूर कोरोनाच्या नवीन लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. कोविड संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. येत्या दोन ते चार आठवड्यांत रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता, सर्व लोकांनी पुन्हा एकदा मास्क घालण्याची सवय लावली पाहिजे, ज्यामुळे कोविड संसर्ग नियंत्रित करण्यास मदत होईल, असं आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी सांगितलं आहे.

नवीन फ्लर्ट कोरोना व्हेरियंटची लक्षणे कोणती?

ताप, खोकला आणि थकवा हा सामान्य कोविड विषाणूची लक्षणे आहेत. काही व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे आणि नाक बंद होणे किंवा नाक वाहणे यांसारखी श्वसनासंबंधिक लक्षणे जाणवतात. काही रुग्णांना चव किंवा वास कमी होणे, हे लक्षण आहे. गेल्या काही काळात नोंद झालेल्या कोविज रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संबंधित लक्षणे आढळून आली आहे. यामध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार या लक्षणांची नोंद झाली आहे. याशिवाय स्नायू किंवा शरीर दुखणे, डोकेदुखी आणि थंडी वाजणे या लक्षणांचाही समावेश आहे. या लक्षणांची तीव्रता अनेक रुग्णांसाठी वेगवेगळी असून काही प्रकरणामध्ये सौम्य ते गंभीर लक्षणे, तर काही रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. तुम्हाला संबंधित लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

देशात नवीन कोरोना व्हेरियंटचा देशात शिरकाव, महाराष्ट्रात FLiRT कोविड विषाणूचे 100 रुग्णांची नोंद