Black Tea Benefits : आजकाल ग्रीन टीचा (Green Tea) ट्रेंड आहे. निरोगी राहण्यासाठी डॉक्टरही ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅफिन, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिड आढळतात, जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात. विशेषत: मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबावर हा चहा खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दिवसातून दोनदा दोन कप ग्रीन टीचे सेवन करू शकता. एका अभ्यासातून समोर आलं आहे की, त्याचप्रमाणे काळा चहा (Black Tea) देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या चहाचे सेवन केल्याने शरीरावर चांगला परिणाम होतो. बदलत्या ऋतूमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका मिळते. या ऋतूत असामान्य तापमानामुळे सर्दी, खोकला, तापाचा धोका वाढतो. जाणून घ्या चहाचे फायदे-



अभ्यासात काळा चहा ठरला 'लाईफ चेंजर'


फ्लेव्होनॉइड्स नैसर्गिकरित्या सामान्य पदार्थांमध्ये आढळतात. सफरचंद, आंबट फळे, बेरी, काळा चहा, हे सर्व पदार्थ दीर्घकाळापासून आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून ओळखले जात आहेत. मात्र, आता या पदार्थांच्या फायद्यांबाबत एडिथ कोवेन विद्यापीठात एक महत्वाचा अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, हे फ्लेव्होनॉइड असलेले पदार्थ आपल्याला इतके फायदे देतात की, आपण कल्पनाही केली नसेल. अभ्यासानुसार, हार्ट फाउंडेशनने 881 वयोवृद्ध महिलांवर एक अभ्यास केला, या सर्व महिलांचे सरासरी वय 80 वर्षे होते. अभ्यासात असे आढळून आले की, जर तुम्ही तुमच्या आहारात फ्लेव्होनॉइड्सचे सेवन केले, तर पोटाच्या समस्या होण्याची शक्यता कमी असते. अभ्यासात असेही आढळून आले की, ज्यांनी फ्लेव्होनॉइड्सचे सेवन केले त्यांना शरीराचे इतर विकार होण्याची शक्यता कमी आहे. 



कर्करोगाचा धोका कमी


नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) च्या संशोधनातून समोर आले आहे की, काळा चहा प्यायल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यात पॉलिफेनॉल आढळतात, ज्यामुळे ट्यूमर वाढण्याचा धोका कमी होतो. यामुळे त्वचा, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेटचा धोका कमी होतो.


हृदयासाठी चांगले


काळ्या चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स (फ्लेव्होनॉइड्स) हृदयासाठी फायदेशीर असतात. काळ्या चहाच्या नियमित सेवनाने हृदय आणि रक्तवहिन्यासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. तसेच उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. यासाठी रोज सकाळी काळा चहा प्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


Health Tips : दिवसभरात इतकी मिनिटे उन्हात बसणे शरीरासाठी आवश्यक; व्हिटॅमिन डी बरोबरच मिळतात आश्चर्यकारक फायदे