Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसभर ऑफिस, काम आणि घरात बसतात. कामात व्यस्त असल्यामुळे लोक अशा गोष्टींपासून दूर जातात जे त्यांच्या शरीरासाठी फायदेशीर आणि निरोगी राहण्यास मदत करते. सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील हाडे तर मजबूत होतातच शिवाय अनेक फायदेही होतात. या संदर्भात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी सांगितले की, दररोज 25 ते 30 मिनिटे उन्हात बसणे शरीरासाठी आवश्यक आणि पुरेसे आहे.


डॉ. भावसार यांनी सांगितले की, सूर्योदय होण्यापूर्वी अर्धा तास आणि सूर्यास्त होण्यापूर्वी प्रत्येकाने 20 ते 25 मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे. यातून शरीराला केवळ व्हिटॅमिन डी मिळत नाही तर शरीरात अनेक हार्मोन्स बाहेर पडतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.


20 मिनिटे सूर्यप्रकाशात बसण्याचे फायदे : 


ताण कमी होतो : दररोज 20 ते 25 मिनिटे उन्हात बसल्याने आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होतो ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.


चांगली झोप येते : तुमची मेलाटोनिन पातळी कधी वाढवायची आणि कमी करायची हे तुमच्या शरीराला सांगून सूर्यप्रकाश तुमच्या सर्कॅडियन लय नियंत्रित करतो. झोपेच्या वेळी एखादी व्यक्ती जितका जास्त सूर्यप्रकाश घेईल तितके शरीरात मेलाटोनिनचे उत्पादन चांगले होईल.


रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत : सूर्यप्रकाशात राहिल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर अनेक आजार, इन्फेक्शन, कॅन्सरचा धोका काही कमी करता येतो.


रक्त प्रवाह सुरळीत राहतो : दररोज 20 ते 25 मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्यास शरीराला उष्णता मिळते. त्यामुळे थंडीमध्ये आकुंचित होणाऱ्या रक्तवाहिन्या सामान्य होऊन शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते.


व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयरोग, मेटाबॉलिक सिंड्रोम, प्रजनन क्षमता प्रभावित होते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वर्षातील किमान 40 दिवस, दररोज 40 मिनिटे सूर्यप्रकाशात राहणे आवश्यक आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जरी 40% सूर्यप्रकाश घेतला तरी आरोग्यासाठी चांगला असतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय