Health : आजकालची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि कामाचा ताण या गोष्टींमुळे अनेक जण विविध आजारांना बळी पडत आहे. त्यापैकी एक मुख्य आजार म्हणजे लठ्ठपणा..! शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुमची जीवनशैली आणि आहार दोन्ही उत्तम असणे गरजेचे आहे. वैद्यकीय अहवालांनुसार जास्त वजनामुळे तुम्ही मधुमेह, रक्तदाब, यकृताचे आजार आणि इतर अनेक आजारांना बळी पडू शकता. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत जवळपास सर्वांनाच वाढत्या वजनाच्या समस्येने ग्रासले आहे, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, योग्य आहार आणि जीवनशैली राखून वजन नियंत्रित ठेवता येते. यासाठी सर्व लोकांसाठी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की तुमचे वय आणि उंचीनुसार, किती वजन सामान्य आहे आणि किती जास्त आहे? या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करू की किती वजन आपल्यासाठी चांगले मानले जाऊ शकते. तुमचे वजन नियमितपणे तपासत राहा आणि ते वाढू नये यासाठी प्रयत्न करा.


 


आरोग्य तज्ज्ञांकडून समजून घेऊया, उंचीनुसार योग्य वजन काय आहे?


आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान मुलांमध्ये लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. ज्यामुळे लहान वयातच मधुमेह आणि रक्तदाब सारखे आजार होण्याचा धोका असतो. मुलांसाठी, उंची आणि वजनाचे नियमितपणे निरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे, यामुळे विकासाच्या समस्या लवकर ओळखण्यात मदत होऊ शकते. एका महिन्याच्या बाळासाठी त्याची उंची सुमारे 53 सेमी असल्यास त्याचे वजन 4.35 किलो आदर्श मानले जाते. 3 महिन्यांच्या बाळासाठी ज्याची उंची 60 सेमी आहे, तर त्याच्यासाठी 6 किलो वजन योग्य आहे.


वय (वर्षे) उंची (सेमी) वजन (किलो) - लहान मुलांसाठी


4            62              6.5
6            64              7.5
9            70              8.5
12          74              9-10
दीड वर्ष   80             10-11
दोन वर्ष   85              11.75-13



पुरुषांसाठी योग्य वजन


आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, मध्यम शरीर रचना असलेल्या पुरुषांसाठी, उंची 5'4" ते 6'0" दरम्यान असल्यास आदर्श वजन 50-73 किलो आहे. तुमचे वजन जितके नियंत्रित असेल तितके जास्त आजार टाळता येतील.


उंची (फिट) वजन (किलो) - पुरुषांसाठी


4′ 6            29-34
4′ 8            34-40
4′ 10          38-45
5′ 0            43-53
5′ 2           48-58
5′ 4           53-64
5′ 6           58-70
5′ 8          63-76
6′ 0          72-88


महिलांसाठी योग्य वजन


तज्ज्ञांच्या मते, मध्यम शरीर रचना आणि 4'10" ते 5'8" दरम्यान शरीराची उंची असलेल्या महिलांसाठी आदर्श वजन 45-59 किलो मानले जाते.


उंची (फिट) वजन (किलो) - महिलांसाठी


4′ 6   28-34
4′ 8   32-39
4′ 10 36-44
5′ 0   40-49
5′ 2   44-54
5′ 4   49-59
5′ 6  53-64
5′ 8  57-69
6′ 0  65-79


प्रत्येक व्यक्तीसाठी समान वजन आदर्श असेलच असे नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे शरीराची उंची, वय आणि शारीरिक रचना यासारख्या घटकांवर देखील अवलंबून असते. तुमच्या शारीरिक परिस्थिती आणि इतर घटकांवर आधारित कोणते वजन योग्य आहे याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


 


 


हेही वाचा>>>


Employee Health : 21 ते 30 वयोगटातील कर्मचाऱ्यांना कामाचा सर्वाधिक ताण, तर पुरुषांपेक्षा महिला जास्त तणावग्रस्त, सर्वेक्षणातून माहिती समोर


 


 


(टीप : हा लेख वैद्यकीय अहवालांमधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )