Employee Health : आजकालची बदलती जीवनशैली, कामाच्या बदलत्या स्वरुपामुळे अनेक जणांना ताण येत असल्याचं समोर येतंय, तर काही जण विविध आजारांनी त्रस्त असल्याचं समोर आलंय. नुकतेच भारतातील 5,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 21 ते 30 वयोगटातील कर्मचाऱ्यांना कामाचा सर्वात जास्त ताण येतो, तर 41 ते 50 वयोगटातील लोक सर्वात आरामशीर असतात. हे सर्वेक्षण YourDOST या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि भावनिक बाबींशी निगडीत असलेल्या कंपनीने केले.


 


 31-40 वयोगटातील कर्मचारी दुसऱ्या क्रमाकांवर!


"इमोशनल वेलनेस स्टेट ऑफ एम्प्लॉइज" अहवालात असे म्हटले आहे की, 31-40 वयोगटातील कर्मचारी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त तणावग्रस्त गट आहेत आणि त्यापैकी 59.18 टक्के लोकांना उच्च पातळीवरील चिंता अनुभवत आहे. YourDOST चे मुख्य मानसशास्त्र अधिकारी डॉ. जिनी गोपीनाथ म्हणाले, "कामाच्या ठिकाणी होणारी स्पर्धा, कामाची गती, रिमोट आणि हायब्रिड वर्क, यांचा 21-30 वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम झाला आहे. या सर्वेक्षणात तरुण, प्रौढ तसेच महिली कर्मचाऱ्यांसोबत कामाच्या ठिकाणी मानसिक स्थिती, कामाच्या स्वरुपाबाबत आणि भावनिक बाबींवर चर्चा करण्यात आली. तर त्यातून असं स्पष्ट झालं की, ज्या कर्मचाऱ्यांना उच्च तणाव आहे, त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर यात कुटुंब, मित्र आणि इतर संबंधित विषयांचा समावेश असल्याचं स्पष्ट झालं.


 


कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त ताण



तर या सर्वेक्षणात असंही स्पष्ट झालंय की, कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त ताण येतो, महिला या पुरुषांपेक्षा अधिक तणावग्रस्त होत्या. जवळपास 72 टक्के महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ताणाची उच्च पातळी नोंदवली. दुसरीकडे, 53.64 टक्के पुरुषांनी सांगितले की, त्यांना उच्च-तणाव पातळीचा अनुभव येतो. व्यावसायिक जीवन आणि खाजगी जीवनाचा समतोल नसणे, ओळखीचा अभाव, सतत कमी मनोबल आणि नेहमी न्याय मिळण्याची भीती हे तणाव वाढण्यास कारणीभूत आहेत, असे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. अभ्यासात असेही आढळून आले आहे की, वर्ष-दर-वर्ष या आधारावर, उच्च आणि अत्यंत तणावाच्या पातळीने ग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 31 टक्के वाढ झाली आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ गोपीनाथ म्हणाले, "सर्वेक्षण करताना आम्ही असे पाहिले की, समुपदेशन ही तणाव संतुलित करण्यात मोठी भूमिका बजावते - कामाच्या ठिकाणी एक सहाय्यक आणि सर्वसमावेशक वातावरण कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या बाहेरील त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात महिलांना मदत करण्यासाठी खूप मदत करते."


 


हेही वाचा>>>


Health : 'कोरोनाची साथ पुन्हा येतेय?' 'खिलाडी' नंतर अमेरिकेच्या राष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण, WHO ने सांगितलं...


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.