Health : देशासह राज्यात सध्या उष्णतेचं प्रमाण इतकं वाढलंय की काही लोकांना AC शिवाय जमतच नाही. दिवस दिवसभर AC ची थंड हवा घेतल्याशिवाय त्यांना अस्वस्थ वाटू लागते. घर असो किंवा ऑफिस, लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ एसीसमोर घालवतात. उन्हाळ्यात, थंड राहण्यासाठी दिवसभर एसी हवा घेत असाल तर सावधान.... कारण त्याच एसी रूममधून बाहेर पडताच शरीराचे काय नुकसान होते? अचानक एसी रूममधून गरम वातावरणात गेल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो? तज्ज्ञांकडून यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या..
उन्हाळ्यात लोकांमध्ये एसीचा ट्रेंड खूप वाढलाय
सध्या देशात वाढत्या तापमानासोबत उष्णताही अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हाने नागरिक अक्षरश: होरपळलेत, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अशात प्रखर उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून लोक कूलर-एसीचा वापर करतात. सध्या लोकांमध्ये एसीचा ट्रेंड खूप वाढला आहे. ऑफिस असो की घर, लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ एसीसमोर घालवतात. मात्र एसीची हवा सतत घेतल्याने आरोग्यालाच हानी पोहोचत नाही तर एसीतून अचानक बाहेर पडल्याचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एअर कंडिशनिंगच्या थंड हवेत बसल्यानंतर, जेव्हा तुम्ही बाहेर गरम वातावरणात जाता, तेव्हा तापमानात अचानक बदल होतो, ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार आरोग्यतज्ज्ञ डॉ. विपुल गुप्ता यांनी याबाबत माहिती दिलीय.
डॉक्टर काय म्हणतात?
डॉक्टर स्पष्ट करतात की जेव्हा तुम्ही एअर कंडिशनिंगच्या थंड वातावरणातून बाहेर पडता तेव्हा तापमानात अचानक होणारा बदल तुमच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकतो. जेव्हा शरीर नियंत्रित, थंड वातावरणातून या तीव्र उष्णतेकडे जाते तेव्हा त्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक शारीरिक प्रतिक्रिया सुरू होऊ शकतात.
हृदयासाठी वाईट
अचानक एसी रूममधून बाहेर पडल्याने सर्वप्रथम तुमच्या हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. उष्णतेमुळे थंड वातावरणात संकुचित झालेल्या रक्तवाहिन्यांचा विस्तार वेगाने होऊ लागतो, परिणामी रक्तदाब झपाट्याने कमी होतो. यामुळे विशेषतः हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये चक्कर किंवा भोवळ येऊ शकते.
ब्राँकायटिस किंवा दम्यासाठी हानिकारक
उच्च तापमानाच्या अचानक संपर्कामुळे ब्राँकायटिस किंवा दमा यांसारखे श्वसनाचे आजार बिघडू शकतात. याशिवाय, जेव्हा शरीर जास्त घाम गाळून स्वतःला थंड करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा उष्णतेमुळे डिहायड्रेशन देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत, लिक्विड आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, थकवा आणि स्नायूंमध्ये पेटके होऊ शकतात.
उष्माघात
शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास उष्माघातास कारणीभूत ठरते. हा एक गंभीर आजार आहे. ज्यामुळे विचलित होणे, जलद हृदयाचे ठोके आणि भोवळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. जेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता अपयशी ठरते, तेव्हा शरीराचे तापमान झपाट्याने वाढते, ज्यामुळे उष्माघात होतो.
हेही वाचा>>>
तुम्हालाही विविध भास अन् भीती त्रास देतात, तर सावधान! 'हा' एक मानसिक आजार असू शकतो, मानसोपचारतज्ज्ञ सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )