World Schizophrenia Day 2024 : तुम्हालाही कधीतरी विविध प्रकारचे भास होतात? किंवा एक प्रकारची भीती सतावते, तर याला हलक्यात घेऊ नका. कारण हा एक मानसिक आजार असू शकतो. हो हे खरंय.. यामध्ये पीडित व्यक्ती अनेकदा भ्रम आणि भीतीदायक सावली पाहण्याची तक्रार करते. अशात या व्यक्तीचे विचार आणि वागण्यात असामान्य बदल घडतात. जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस हा दरवर्षी 24 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा एक मानसिक आजार आहे. स्किझोफ्रेनियाची काही प्रमुख कारणे तज्ज्ञांच्या मदतीने जाणून घेऊया.


 


कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या मानसिक आजाराला बळी पडू शकतात


जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस दरवर्षी 24 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. महिला, पुरुष किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या मानसिक आजाराला बळी पडू शकतात. या आजारामुळे त्रस्त असलेले लोक स्वतःच्या जगात मग्न राहतात आणि स्वतःला लोकांपासून वेगळे करतात. साधारणपणे, त्याची लक्षणे पौगंडावस्थेपासूनच दिसू लागतात, जसे की अभ्यासात रस नसणे, चिडचिड होणे, झोपेची समस्या, एकटे राहणे, स्वतःशी हसणे किंवा रडणे, कशावरही लक्ष केंद्रित न करणे इत्यादी..अशात, रुग्णाला स्वतःची काळजी घेणे अशक्य होते, तेव्हा त्याला कुटुंब आणि समाजाच्या समर्थनाची आवश्यकता असते. याच उद्देशाने, लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस जगभरात साजरा केला जातो. या लेखात, तज्ज्ञांच्या मदतीने आपण जाणून घेणार आहोत की, स्किझोफ्रेनियाचा धोका ज्यामुळे वाढतो, त्या आजारासंबंधित कारणे काय आहेत? .



स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?


स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक विकार आहे, ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती अनेकदा आपले संपूर्ण आयुष्य लढण्यात घालवते. यामुळे पीडित व्यक्ती आपली कल्पना सत्य म्हणून स्वीकारते आणि गोंधळलेल्या स्थितीत राहते. सोप्या शब्दात समजून घेतल्यास, आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा एक न्यूरोट्रांसमीटर असतो, जो मेंदू आणि शरीरात समन्वय साधण्याचे काम करतो, परंतु जेव्हा काही कारणांमुळे डोपामाइनचे प्रमाण वाढते तेव्हा त्याला स्किझोफ्रेनिया म्हणतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगातील अंदाजे 1 टक्के लोक स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहेत, तर भारतात या आजाराच्या रुग्णांची संख्या सुमारे 40 लाख आहे.


 


मानसोपचारतज्ज्ञ काय सांगतात?


याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर यांनी याबाबत माहिती दिलीय. डॉ कपूर म्हणतात, खराब जीवनशैली आणि पुरेसे पोषण न मिळाल्याने देखील स्किझोफ्रेनियाचा धोका होऊ शकतो. "अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मादक पदार्थांचा वाढता वापर आणि अपुरी झोप यासारख्या सवयींच्या अभावामुळे लोकांमध्ये स्किझोफ्रेनियासह इतर मानसिक आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका जास्त असतो. पोषणाची कमतरता, विशेषत: अत्यावश्यक फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची कमतरता, मेंदूचे कार्य बिघडू शकते आणि स्किझोफ्रेनियाची पूर्वस्थिती वाढवू शकते," डॉ ज्योती म्हणाल्या. याव्यतिरिक्त, दीर्घकालीन तणाव आणि खराब जीवनशैली वर्तणुकीमुळे न्यूरोइंफ्लॅमेशन आणि न्यूरोट्रांसमीटरचे विनियमन होऊ शकते, जे या रोगाच्या घटनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणून जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त, जोखीम कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव कमी करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे.


 


 


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो.. थायरॉईडच्या समस्याचं प्रमाण वाढतंय, 'या' लक्षणांवरून ओळखा, अशी घ्या काळजी


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )