मुंबई : देशातील वातावरण तापले असून हवामानातही चांगलाच बदल अनुभवायला मिळत आहे. वाढती उष्णतेने दर दुसऱ्या दिवशी तापमानाचे नवनवीन विक्रम मोडीत काढत आहे. देशात सर्वत्र उन्हाच्या झळा बसताना दिसत आहेत. कडाक्याच्या उन्हात लोकांना घरातून बाहेर पडताच थंड पेय पिण्याला प्राधान्य देतात. पण उष्णता इतकी असते की तुम्ही घरून सोबत आणलेलं पाणीसुद्धा लगेच गरम होतं. अशा परिस्थितीत तुम्हीही अतिशय गार पाणी किंवा बर्फ टाकून पितात का? तुम्हीही असं करत असाल, तर ही चिंतेची बाब असू शकते.
गारेगार थंड पाणी पिण्याचे तोटे
कडक उन्हात तुम्ही हे बर्फाचे पाणी पीत असाल तर ते तुमच्या आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकते. उन्हाळ्यात बर्फाचे पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणतं नुकसान होऊ शकते. बर्फाचे थंड पाणी पिण्याचे काय तोटे असू शकतात? याबाबत सविस्तर वाचा.
हे आहेत थंड पाणी पिण्याचे दुप्षपरिणाम
पचनासंबंधित समस्या
बर्फाच्या पाण्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे पोटाचे स्नायू आकुंचन पावतात, पचनक्रिया मंदावते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता
अतिशय गारेगार बर्फाचे पाणी प्यायल्यावर घशातील नळ्या थंड होतात, यामुळे घशात सूज येऊ शकते. यामुळे सर्दी, घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
रक्तवाहिन्या आकुंचन पावणे
बर्फाचे पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे हृदयावर दाब पडू शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो.
चयापचय क्रियेवर परिणाम
थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होते, ज्यामुळे चयापचय मंदावते. यामुळे कॅलरी जाळण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
दातांवर परिणाम
थंड पाणी प्यायल्यामुळे दातांची सेन्सिटीव्हिटी वाढू शकते. यामुळे दातांमध्ये वेदना आणि संवेदनशीलता वाढू शकते, विशेषत: जर दात आधीच कमकुवत असतील तर ही समस्या तीव्र होऊ शकते.
फ्रीजशिवाय उन्हाळ्यात पाणी थंड कसं ठेवायचं? तुमच्या बाटलीतील पाणी थंड ठेवण्याचे कोणते मार्ग आहेत?
वॉटर कुलर बॉक्स वापरा
बाजारात अनेक वॉटर कुलर बॉक्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमची आधीच थंड पाण्याची बाटली ठेवू शकता. हे पाणी कित्येक तास थंड राहू शकते. यामध्ये बर्फ वापरता येतो, पण तो पाण्यात मिसळत नाही.
थर्मास बाटली सोबत ठेवा
जर तुम्हाला उष्णतेमध्ये बराच वेळ बाहेर राहावे लागत असेल तर तुम्ही एक किंवा दोन थर्मल बाटल्या सोबत ठेवू शकता. ही बाटली आतल्या द्रवाचे तापमान कित्येक तास स्थिर ठेवू शकते.
कापड वापरा
जर पाणी खूप गरम असेल आणि तुम्ही तुमच्या पाण्याच्या बाटलीभोवती ओले कापड गुंडाळा.
मातीची बाटली घ्या
मातीच्या बाटलीतील पाणी थंड आणि शुद्ध असेल. त्यावर कापड गुंडाळूनही तुम्ही पाणी जास्त काळ थंड ठेवू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )