Health : उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घामाच्या धारा पण एक दिलासादायक गोष्ट अशी की या ऋतूत फळांचा राजा आंबा याची आतुरतेने वाट पाहिली जाते. पण असे काही खवय्ये आहेत. ज्यांना आंबा तर आवडतोच, सोबतच कैरी देखील आवडीची असते. कैरी कापून त्याला मस्त मीठ मसाला लावला की थी खायला अतिशय चटकदार होते. आपण या लेखात पाहणार आहोत. या उन्हाळ्यात कैरी खाणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे..
काहींना आंबे तर काहींना कैरी आवडते..
उन्हाळा हा त्रासदायक असेल पण या ऋतूत आपल्याला अशी अनेक फळे खायला मिळतात जी आपल्याला चव देतात. या मोसमात आंब्याचा आस्वाद घेता येतो म्हणून बहुतेकांना हा ऋतू आवडतो. साधारणपणे हे प्रत्येक भारतीयाचे आवडते फळ आहे. काहींना पिकलेले आंबे खायला आवडतात तर काहींना कच्चा आंबा म्हणजेच कैरी खूप आवडीने खातात. कच्चा आंबा मीठ, तिखट घालून खाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यातून लोक चटणी बनवतात. ही तर चवीची बाब आहे, पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या फायद्यांची ओळख करून देत आहोत. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार जाणून घेऊया न्यूट्रिशनिस्ट मनप्रीत कौर पॉल यांच्याकडून.
उन्हाळ्यात कच्चा आंबा खाण्याचे फायदे
कच्चा आंबा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तुम्हाला पुन्हा पुन्हा संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांना आळा बसतो.
कच्च्या आंब्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी, ई आणि ए त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन वाढवते आणि त्वचेतील लवचिकता वाढवून वृद्धत्व कमी करते.
कच्चा आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यामध्ये असलेल्या फायबरचे प्रमाण फुगवणे, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. यामध्ये नैसर्गिक पाचक एन्झाईम्स असतात जे अन्नाचे योग्य पचन करण्यास मदत करतात. कच्च्या आंब्यामध्ये पेक्टिन असते ज्यामुळे आतडे निरोगी होतात. यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित राहण्यासही मदत होते.
यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवते. जर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा आहारात समावेश करावा. हे लोहाच्या कमतरतेचा सामना करण्यास मदत करते.
कच्चा आंबा उष्माघाताचा धोका कमी करतो. उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु आंबा खाल्ल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते, त्यामुळे उष्माघात टाळता येतो. यामध्ये असलेले मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाहीत.
गरोदरपणात कच्चा आंबा खाणे देखील फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारख्या जीवनसत्व-खनिजांचा चांगला स्रोत आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health : काय सांगता! 'ही' भाजी मटण-मच्छी पेक्षाही भारी? आरोग्यासाठी फायदेशीर, चवीची गोष्टच न्यारी! जाणून थक्क व्हाल..